esakal | Gram Panchayat Election: सोयगाव तालुक्यात सरपंचपदाची सोडत कधी सुटणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

soygaon

तालुक्यातील 40 ग्रामपंचायतीपैकी 4 ग्राम पंचायती बिनविरोध झाल्यावर 36 ग्राम पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत

Gram Panchayat Election: सोयगाव तालुक्यात सरपंचपदाची सोडत कधी सुटणार ?

sakal_logo
By
यादव कुमार शिंदे

सोयगाव (औरंगाबाद): तालुक्यात 46 ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत ता.२९ जानेवारी पर्यंत होण्याची शक्यता असल्याची माहिती बुधवारी सुत्रांनी दिली. त्यामुळे आठवडाभरात सरपंचपदाची सोडत निघण्याची शक्यता आहे.

40 ग्रामपंचायतीपैकी 4 ग्राम पंचायती बिनविरोध झाल्यावर 36 ग्राम पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. परंतू आता निकालानंतर सोयगाव तालुक्यात सरपंचपदाच्या सोडतीची प्रतिक्षा सगळ्यांना लागली आहे. पहिल्यांदा काढण्यात आलेले सरपंचपदाची आरक्षण सोडत रद्द झाल्यानंतर सोयगाव तालुक्यात महिनाभराच्या कालावधीत दुसऱ्यांदा आरक्षण सोडत काढावी लागणार आहे.

Breaking: मराठा आरक्षणासाठी तरूणाने घेतले विष, तत्पूर्वी फेसबुक लाईव्हद्वारे मांडले प्रश्न |

या सोडतीचा मुहूर्त ता.२९ जानेवारी पर्यंत असणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन सरपंच विराजमान होईल असा अंदाज आहे. 36 ग्रामपंचायातीसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल धक्कादायक लागले असून या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांनी तरुण उमेदवारांना मोठा कौल दिला असून प्रस्थापितांना मोठे धक्के दिले आहेत. त्यामुळे बहुतांशी नवीन सरपंच म्हणून चेहरे पहावयास मिळणार आहे. त्यातच राजकारणात 50 टक्के आरक्षण असलेल्या महिला सदस्यांची संख्या 202 निवडून आलेली असल्याने महिला सरपंच बऱ्याच ग्रामपंचायतीवर दिसतील.

आरक्षणासाठी अडचणी येणार-
आरक्षण सोडतीच्या निकषानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी 27 टक्के आरक्षण सरपंचपदासाठी सोडण्यात आले आहे. परंतु या प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या नगण्य असल्याने या प्रवर्गासाठी सुटलेल्या ग्राम पंचायतींची सरपंचपदाची धुरा अडचणीत येण्याची शक्यता असून या ठिकाणी सरपंच निवडीची प्रक्रिया राबविण्यात निवडणूक विभागालाही अडचणीचे ठरणार आहे.

आईवडिलांचा एकमेव आधार हिरावला, कर्जामुळे तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या

काही ठिकाणी या प्रवर्गाचे सदस्य संख्या रिक्तच आहे. काही ग्राम पंचायतीसाठी या प्रवर्गासाठी आलेले उमेदवारी अर्ज अपात्र ठरलेले आहे. त्यामुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी सोडत निघालेल्या ग्राम पंचायती रिक्तच राहतील त्यामुळे या प्रवर्गाच्या ग्राम पंचायतींचे सरपंच पद रिक्त राहणार आहे.अशी शक्यता आहे.

(edited by- pramod sarawale)