esakal | नवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले!!! 
sakal

बोलून बातमी शोधा

woman crying

२३ वर्षांची सुलक्षणा चुणचुणीत मुलगी. लग्नानंतर हर्सूल परिसरात हे जोडपं राहू लागलं. संसार सुरळित, सुखात सुरु असताना काही वर्षानंतर सुदर्शन दारुच्या व्यसनात पुरता बुडाला.

नवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले!!! 

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : मुळ हैदराबाद माहेर असलेल्या ‘सुलक्षणा’ (नाव बदललं आहे) हिचा पाच वर्षापूर्वी औरंगाबादेतील हर्सूलच्या सुदर्शन (नाव बदललं आहे) विवाह झाला. मात्र काही वर्षानंतर दारुच्या व्यसनात बुडालेल्या सुदर्शनच्या वादाला कंटाळून तीने टोकाचे पाऊल उचलत थेट जीव देण्याचा प्रयत्न केला, मात्र दामिनी पथकाने तीचा जीव तर वाचविला. जेव्हा दोघांना पोलिस ठाण्यात आणले. तेव्हा एकमेकांना बघून दोघेही ठाण्यातच गळ्यात पडून ढसढसा रडले. विशेष म्हणजे दोघांनाही आई नाही, त्यामुळे काहीही झालं तरी ‘आता आपणच एकमेकांसाठी आहोत’ अशी भावना व्यक्त करत दोघेही पोलिसांच्या समूपदेशनानंतर पोलिस ठाण्याच्या बाहेर पडले. 

औरंगाबादच्या बेगम यांची तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका; नातेवाईकांनी मानले पोलिसांचे आभार


२३ वर्षांची सुलक्षणा चुणचुणीत मुलगी. लग्नानंतर हर्सूल परिसरात हे जोडपं राहू लागलं. संसार सुरळित, सुखात सुरु असताना काही वर्षानंतर सुदर्शन दारुच्या व्यसनात पुरता बुडाला. अटोकाट प्रयत्न करुनही तो व्यसनातून बाहेर निघेना. याउपर दिवसेंदिवस दोघांमध्ये खडके उडू लागले. संसाराचं ओझं पेलता पेलता नवऱ्याच्या दारुच्या व्यसनाने पुरती खचली. दोघांतील वाद दिवसेंदिवस वाढतच होता. वादाचा शेवटच करायचा पण स्वतःला संपवून. या उद्देशाने ती हर्सूल तलावात जीव देण्यासाठी गेली. दरम्यान नागरिकांनी विमनस्क अवस्थेत असलेल्या सुलक्षणाला पाहिले आणि पोलिस नियंत्रण कक्षाला संपर्क केला.

पालकांसह विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, औरंगाबादेतील सहावी ते आठवीचे वर्ग सुरु

नियंत्रण कक्षाने तात्काळ भरोसा सेल तथा दामिनी पथकाच्या इंचार्ज पोलिस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांना संपर्क केला असता, करेवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत सुलक्षणाला वाचविले. सुलक्षणाला हर्सूल पोलिस ठाण्यात आणून तिच्या पतीलाही बोलाविले. दोघांचे समुपदेशन केले. दरम्यान दाम्पत्य पोलिस ठाण्यात पाहून एकमेकांच्या गळ्यात पडून रडले. दरम्यान करेवाड यांनी तिच्या माहेरीही फोन करुन संवाद साधला. ही कार्यवाही पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त मीना मकवाना यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक करेवाड यांच्यासह लता जाधव, आशा गायकवाड, गिरीजा आंधळे यांच्या पथकाने केली. 

Edited - Ganesh Pitekar