महिलेचे टोकाचे पाऊल, विषारी औषध घेऊन घेतला जगाचा निरोप

सुषेन जाधव
Wednesday, 3 March 2021

दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फरजाना यांना तपासून मृत घोषित केले. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

औरंगाबाद : रोशन गेट परिसरातील एका ३४ वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन केल्याची घटना बुधवारी (ता.तीन) सकाळी सातच्या सुमारास घडली आहे. महिलेला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सय्यद फरजाना सय्यद अय्युब (३४ वर्षे, रा.करीम कॉलनी, रोशन गेट) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सय्यद फरजाना यांनी राहत्या घरात बुधवारी सकाळी चार वाजेदरम्यान विषारी औषध प्राशन केल्याची बाब घरातील मंडळींना लक्षात येताच फरजाना यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी येथे दाखल करण्यात आले.

हेही वाचा - वाळूज एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग, करोडो रुपयांचे नुकसान

दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फरजाना यांना तपासून मृत घोषित केले. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हारुण शेख करीत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Crime News Woman Ended Life Take Poison