
योगेश गव्हांडे याच्या पश्चात आई कुशीवर्ताबाई, पत्नी अनिता व तीन लहान मुली असा परिवार आहे.
शिवना (जि.औरंगाबाद) : अल्पशा शेतजमिनीत गुजराण होत नसल्याने व त्यातच नव्याने खोदलेल्या विहिरीची कर्जफेड होत नसल्याने शिवना (ता.सिल्लोड) येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी (ता.१७) पहाटे ही घटना उघडकीस आली. योगेश यादवराव गव्हांडे (वय ३१) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याकडे अवघी दोन एकर जमीन आहे.
चारचाकी वाहनावर चालक म्हणून त्याने सुरुवातीला कसाबसा संसाराचा गाडा रेटला. त्यानंतर विविध कार्यकारी सेवा संस्थेसह खासगी कर्ज काढून विहीर खोदली. मात्र, विहिरीला पाणीच न लागल्याने कर्जाचा बोजा वाढत गेला. यातून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
वाचा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मावशीचे निधन, वीस मिनिटांची भेट ठरली शेवटची
योगेश गव्हांडे याच्या पश्चात आई कुशीवर्ताबाई, पत्नी अनिता व तीन लहान मुली असा परिवार आहे. घटनेची अजिंठा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक गिरीधर ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार निलेश सिरसकर पुढील तपास करित आहेत.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संपादन - गणेश पिटेकर