अखेर जिल्हा बँकेवर शिवसेनेचा भगवा; नितीन पाटील बिनविरोध

nitin patil aurangabad dcc bank
nitin patil aurangabad dcc bank

औरंगाबाद: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी अर्ज दाखल केला होता.

मात्र भुमरेंनी अर्ज मागे घेतल्यामुळे नितीन पाटील यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर दुसरीकडे उपाध्यक्षपदासाठी चुरस दिसून आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केला होता.

यामध्ये दिनेश परदेशी, आप्पासाहेब पाटील यांनी माघार घेतली तर जगन्नाथ काळे, कृष्णा पाटील डोणगावकर आणि अर्जुन गाढे हे उपाध्यक्षपदाच्या  रिंगणात आहेत. दुपारी एक वाजे दरम्यान या तिघांमध्ये उपाध्यक्षपदासाठी निवड होणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com