esakal | औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कर वसुलीला ब्रेक !
sakal

बोलून बातमी शोधा

 gram-panchayat.jpg

घरपट्टी आणि पाणीपट्टी मिळून मार्च २०२० पर्यंतची ५ कोटी ९६ लाख ८२ हजार इतकी थकबाकी असून त्यात चालू अर्थिक वर्षांची मागणी मिळून कर वसुलीचा आकडा आणखी मोठा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कर वसुलीला ब्रेक !

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : आर्थिक वर्षाअखेरीस मार्चपर्यंत ग्रामपंचायतींची ३३ कोटी सात लाख ५१ हजार रूपयांची कर वसुली झाली. मात्र कोरोना महामारीनंतर घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीला ब्रेक लागला आहे. मार्चनंतर वसुली नसल्यातच जमा आहे. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

ग्रामपंचायतीना शासन अनुदानाबरोबरच शाश्‍वत उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर आहेत. जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, कन्नड, खुल्ताबाद, वैजापुर, गंगापुर, पैठण या नऊ तालूक्यात २०१९ पर्यंत ५ कोटी ४६ लाख ६५ हजार इतकी घरपट्टी व इतर करांची थकबाकी होती तर २०१९-२० ची ३२ कोटी १० लाख ८१ हजार अशी दोन्ही मिळून ३७ कोटी ५७ लाख ४६ हजार इतकी थकबाकी होती. यापैकी मार्च २०२० अखेरपर्यंत ३३ कोटी ७ लाख ५१ हजार रूपयांची वसुली झाली होती हे प्रमाण ८८.३ टक्के इतके होते. ४ कोटी ४९ लाख ९५ हजार इतकी थकबाकी राहिली होती. ही जुनी थकबाकी आणि चालू अर्थिक वर्षाची मागणी मिळून थकित घरपट्टीचा आकडा आणखी वाढणार आहे. 

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला... 

२०१९-२० या अर्थिक वर्षापुर्वीची पाणीपट्टीची नऊ तालूक्यातील २ कोटी ८४ लाख ६६ हजार थकबाकी होती. २०१९-२० या चालू आर्थिक वर्षाची मागणी १२ कोटी ३४ लाख ३५ हजार अशी १५ कोटी १९ लाख एक हजार मागणी होती. त्यापैकी मार्चअखेरीस १३ कोटी ७२ लाख १४ हजार रूपयांच्या पाणीपट्टीची वसुली करण्यात आल्याचे पंचायत विभागातील सुत्रांकडून सांगण्यात आले.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

घरपट्टी आणि पाणीपट्टी मिळून मार्च २०२० पर्यंतची ५ कोटी ९६ लाख ८२ हजार इतकी थकबाकी असून त्यात चालू अर्थिक वर्षांची मागणी मिळून कर वसुलीचा आकडा आणखी मोठा आहे. तथापि मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाची साथ सुरू झाल्याने ग्रामपंचायतींच्या करवसुलीला पुर्णपणे ब्रेक लागला आहे. चालू अर्थिक वर्षाचे पाच महिने होत आले तरी वसुलीच नसल्याने यावर्षिच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर खूप मोठा परिणाम होणार असल्याचे मत सुत्रांनी व्यक्त केले.

(संपादन-प्रताप अवचार)