esakal | औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला...
sakal

बोलून बातमी शोधा

सुमित.jpg

सुमित महाजन याने यूपीएससी परीक्षेत पाच वेळेस अपयश आल्यानंतरही सहाव्या प्रयत्नात देशात २१४ रँकने उत्तीर्ण झाला आहे. सुमितने शिक्षणामध्ये पहिल्यापासूनच जिद्द, चिकाटी व मेहनत दाखविल्याने दहावीत तो ९६%  घेऊन उत्तीर्ण झाला होता. बारावीलाही सरस्वती भुवन महाविद्यालय औरंगाबाद येथे चांगला अभ्यास करून चांगल्या गुणांने पास झाला.

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला...

sakal_logo
By
नवनाथ इधाटे

फुलंब्री (औरंगाबाद) : शिक्षण विस्तार अधिकारी असलेले राजेश महाजन यांचा मुलगा सुमित महाजन याने सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परिक्षेत घवघवीत यश संपादन करून देशात २१४ नंबरच्या रँकने उत्तीर्ण होऊन यश संपादन आहे. वडील राजेश महाजन शिक्षण विस्तार अधिकारी असल्याने वडीलापासूनच प्रशासकीय सेवेत येण्याचा प्रेरणा मिळाली असल्याचे सुमित महाजनने सकाळ शी बोलताना (ता.चार) सांगितले. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  

फुलंब्री शहरात गट शिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून राजेश महाजन कार्यरत आहे. त्यांचा मुलगा सुमित महाजन याने यूपीएससी परीक्षेत पाच वेळेस अपयश आल्यानंतरही सहाव्या प्रयत्नात देशात २१४ रँकने उत्तीर्ण झाला आहे. सुमितने शिक्षणामध्ये पहिल्यापासूनच जिद्द, चिकाटी व मेहनत दाखविल्याने दहावीत तो ९६%  घेऊन उत्तीर्ण झाला होता. बारावीलाही सरस्वती भुवन महाविद्यालय औरंगाबाद येथे चांगला अभ्यास करून चांगल्या गुणांने पास झाला.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  
त्यानंतर बी.टेकचे शिक्षण व्ही.जे.टी.आय कॉलेज मुंबई येथे इंजिनिअरिंगची पदवी घेतली. शेवटच्या वर्षात सुलजर पंप या कंपनीत छान पॅकेज वर नोकरी मिळली होती. परंतु वडिलांची सेवा व आजोबांची इच्छा म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय सुमितने घेतला. २०१४ पासून या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. प्रत्येक वेळी कुठल्यातरी पायरीवर हुलकावणी मिळत होती. परंतु एखाद्या योध्याप्रमाणे पुढील वेळा आणखी जास्त जोमाने मागची चूक दुरुस्त करून अभ्यासात सातत्य ठेवले. दगडालाही पाझर फुटले असा एकाग्रतेने अभ्यास केला.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

एवढया सहा वर्षाच्या काळात अभ्यासात मात्र कधीही खंड नव्हता. त्यामुळे पुणे येथे अभ्यास करीत असताना अभ्यासात सातत्य ठेवल्याने सुमित महाजनला यश मिळाले आहे. त्याच्या यशात कुटुंबातील प्रत्येकाने साथ दिल्याने हे शक्य झाले असल्याचे सुमितने सांगितले. सुमितच्या घरामध्ये आजी कांताबाई महाजन, आजोबा श्रीराम कव्हळेकर, आई संध्या महाजन, वडील राजेश महाजन, भाऊ अतुल महाजन, बहीण प्रतीक्षा महाजन, मामा गजानन कव्हळेकर या सर्वांनी सुमितला प्रेरणा देऊन यशाकडे वाटचाल करायला लावली. सुमितला तुकाराम जाधव व आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

सातत्य परिश्रम व संयम कायम ठेवला. मागील प्रयत्न आलेल्या अपयशाची तात्काळ दुरुस्ती केली. मागील चूक पुन्हा पुन्हा न करता त्याच वेळी ती दुरुस्ती केली. विस्तार अधिकारी असलेल्या वडिलांची प्रेरणा घेऊन यूपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. 
- सुमित राजेश महाजन 

संपादन-प्रताप अवचार