esakal | पुरवणी परीक्षेत औरंगाबाद विभागाची सरशी; दहावीचा ३९.११, बारावीचा ३७.६३ टक्के निकाल
sakal

बोलून बातमी शोधा

2hsc_0

माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. २३) ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला.

पुरवणी परीक्षेत औरंगाबाद विभागाची सरशी; दहावीचा ३९.११, बारावीचा ३७.६३ टक्के निकाल

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. २३) ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. राज्याचा दहावीचा निकाल ३२.६० टक्के; तर बारावीचा निकाल १८.४१ टक्के लागला. औरंगाबाद विभागाचा दहावीचा ३९.११ तर बारावीचा निकाल २७.६३ टक्के लागला आहे. फेब्रुवारी-मार्च परीक्षेच्या तुलनेत या परीक्षेत औरंगाबाद विभाग प्रथमस्थानी असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी फेब्रुवारी-मार्चमधील मूळ परीक्षेच्या निकालानंतर लगेचच जुलैत पुरवणी परीक्षा घेतली जाते. यंदा कोरोनामुळे ही परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाली. नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या पाहता यंदा पुरवणी परीक्षेला अत्यंत कमी विद्यार्थी होते. औरंगाबाद विभागातून बारावीच्या परीक्षेसाठी ६ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १ हजार ९१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल २७.६३ टक्के आहे. दहावीसाठी विभागातून एकूण ६ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २ हजार ४७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ३९.११ आहे.

गुणपडताळणी, छायाप्रतींसाठी...
विद्यार्थ्यांना गुरुवारपासून (ता.२४) गुणपडताळणी, उत्तर पत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरून दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in आणि बारावीसाठी http:/verification.mh-hsc.ac.in स्वत: किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी आवश्यक सूचना संकेतस्थळावर आहेत. गुणपडताळणीसाठी २४ डिसेंबर ते २ जानेवारी, छायाप्रतींसाठी १२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. त्यासोबतच ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येईल.

Edited - Ganesh Pitekar