मराठवाड्यात पीककर्ज वाटपात औरंगाबाद पहिल्या क्रमांकावर

10Agriculture_Loan
10Agriculture_Loan

औरंगाबाद : जिल्ह्यात २१ सप्टेंबरपर्यंत ३ लाख ३० हजार ४३३ शेतकऱ्यांना १ हजार १९९.९६ कोटी रुपयांचे खरीप पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये आठ बँकांनी शंभर टक्के पीककर्ज वाटप केले. औरंगाबाद जिल्हा पीककर्ज वाटपात महाराष्ट्रात सहाव्या, तर औरंगाबाद विभागात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. यावेळी जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेंगावकर यांची उपस्थिती होती.


औरंगाबाद जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी पीककर्जाचे १ हजार ४९६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरीप पीककर्जासाठी १ हजार १९६.७९ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. रब्बीसाठी पीककर्जाचे उद्दिष्ट २९९.२० कोटींचे उद्दिष्ट आहे.

या वर्षी जिल्ह्यात खरीप पीककर्जाजचे वितरण १००.२७ टक्के झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २६९.९५ टक्के शेतकऱ्यांना २०३.९० टक्के इतका जास्तीचा कर्जपुरवठा झाला. २०१९-२० मध्ये ८५ हजार ३६४ शेतकऱ्यांना ५८८.५० कोटींचे खरीप पीककर्ज वितरण झाले होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी उद्दिष्टांच्या ९२.३२ टक्के पीककर्ज वितरण केले. तर खासजी क्षेत्रातील बँकांनी उद्दिष्टांच्या ६६.८० टक्के एवढे पीककर्ज वाटप केले आहे. रब्बी हंगामासाठी १ ऑक्टोंबर २०२० पासून पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरु होईल.

पिकांचे पंचनामे सुरु
जिल्ह्यात जोरदार पावसामुळे अनेक भागात पीके सडली आहे. वादळी वाऱ्याने पीक आडवी झाली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून पिकांचे पंचनामे सुरु झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली.

शंभर टक्के खरीप पीककर्ज वाटप करणाऱ्या बँका

बँका.........................आजवर कर्ज वितरण (कोटींमध्ये)..............उद्दिष्ट टक्केवारी
महाराष्ट्र ग्रामीण बँक................११३.७९......................................१६६.००
बँक ऑॅफ इंडीया...................२९.८०........................................१४७.००
बँक ऑफ महाराष्ट्र..................१७६.४५......................................१४२.६१
बँक ऑफ बडोदा....................५२.४१.......................................११७.७८
ॲक्सिस बँक........................९.२२.........................................११७.१०
पंजाब नॅशनल बँक..................३.५४..........................................१०४.२५
औरंगाबाद जिल्हा. म. बँक..........४२८.७०.......................................१०४.२५
युनियन बँक ऑफ इंडीया.............७.४२..........................................१०१.५८


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com