फिरायला गेले अन् बिबट्या दिसला..! मग काय...वाचा सविस्तर..!  

मनोज साखरे 
Tuesday, 14 July 2020

देवळाईच्या डोंगरात आज (ता. १४) बिबट्याचे दर्शन झाले. काही नागरिक पहाटे फिरण्यासाठी गेल्यानंतर त्यांना बिबट्या दिसल्याचे त्यांचे म्हणणे आहे

औरंगाबाद : देवळाईच्या डोंगरात आज (ता. १४) बिबट्याचे दर्शन झाले. काही नागरिक पहाटे फिरण्यासाठी गेल्यानंतर त्यांना बिबट्या दिसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. औरंगाबाद शहराला लागूनच हा डोंगर असल्याने सातारा देवळाईसह शहवासींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाला आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

विविध स्थानिकांच्या माहितीनुसार, बाळापूर शिवारातील  देवळाई डोंगर परिसरात बिबट्या वावरत असल्याची माहिती समोर आली. तसेच छायाचित्रही व्हाट्सअपद्वारे या भागात व्हायरल झाले. त्यानंतर माहिती घेतली असता डोंगर परिसर देवळाईचाच असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या डोंगर भागात नागरिक फिरण्यासाठी नेहमी जातात. अनुचित प्रकार होऊ नये, खबरदारी म्हणून ही माहिती व्हाट्सअपद्वारे पोस्ट करण्यात आली असेही स्थानिक म्हणाले.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

डोंगर उताराला एका दगडावर बसलेला व काही वेळानंतर संचार करताना बिबट्याचे छायाचित्र समोर आले आहे. या भागात बिबट्याचा काही दिवसांपासून वावर आहे. याच काळात बिबट्याने एका गायीचा फडशा पाडला होता. तसेच या घटनेनंतर वन विभागानेही हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले आहे. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

सातारा देवळाई परिसरातील डोंगरावर बिबट्या दिसला असल्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो या डोंगरावरचा नाही. चुकीचा फोटो व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. तरी देखील वनविभागाच्या वतीने या पूर्वीच डोंगरावर नागरिकांना जाण्यासाठी प्रतिबंध केलेला आहे. विनाकारण लोकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी सातारा देवलाईतील लोकांशी चर्चा केली आहे. 

एस. बी. तांबे, औरंगाबाद वनपरिक्षेत्र अधिकारी.

सकाळपासून काहीं व्हॉटसउप ग्रुपवर सातारा देवलाई डोंगरात बिबट्या दिसला आहे. या संबंधात फोटो व्हायरल झाले आहे. म्हणून आम्ही गावकऱ्यांना डोंगरावर जाऊ नये सूचना दिल्या आहेत. तरी वन विभागाने या परिसरात कडक बंदोबस्त लावावा अशी मागणी आहे. लोकांनी देखील पॅनिक होऊ नये. 
सोमीनाथ शिराणे, सातारा देवळाई संघर्ष समिती. 

(संपादन : प्रताप अवचार) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad hill of Deolai Leopard sighting