esakal | BIG NEWS : धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!  
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news
  • सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयात आतापर्यंत १८ वाघांचा जन्म.
  • दुसरीकडे वाघांच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळेही प्राणिसंग्रहालय चर्चेत आले.
  • गेल्या पाच वर्षांत तब्बल पाच वाघांचे मृत्यू .
  • किडनीच्या आजाराने घेतला अनेकांचा बळी.

BIG NEWS : धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!  

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : वाघांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असताना महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयात आतापर्यंत १८ वाघांचा जन्म झाला आहे. त्यामुळे महापालिकेने देशभरातील अनेक प्राणिसंग्रहालयाला वाघ दिले. दुसरीकडे वाघांच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळेही प्राणिसंग्रहालय चर्चेत आले आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल पाच वाघांचे मृत्यू प्राणिसंग्रहालयातच झाले आहेत. सहा वर्षांची करिना पाचवा बळी ठरली. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयातील वाघ हे पर्यटकांचे आकर्षण असून, दरवर्षी लाखो पर्यटक याठिकाणी भेटी देतात; मात्र अपुरी जागा, प्राण्यांच्या पिंजऱ्यांची चुकीच्या पद्धतीने केलेली मांडणी, देखभाल दुरुस्तीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे प्राणिसंग्रहालय वादात सापडले होते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालयाचा परवाना रद्द करून महापालिकेला मोठा झटकाही दिला.

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
 

त्यावर लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून परवाना पूर्ववत करून घेतला; मात्र अद्याप प्राणिसंग्रहालयातील चित्र बदलले नाही. त्यात बुधवारी (ता.२४) करिना वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे प्राणिसंग्रहालय चर्चेत आले आहे. महापालिकेला फक्त आठ वाघ ठेवण्याची परवानगी असल्यामुळे अतिरिक्त वाघ केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या आदेशानुसार इतर प्राणिसंग्रहालयात पाठविले जातात. दुसरीकडे वाघांच्या मृत्यूची आकडेवारी वाढत आहे. २०१५ ते २०२० दरम्यान पाच वाघांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश वाघ किडनीच्या आजाराने त्रस्त होते, असे सूत्रांनी सांगितले. 

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

कमी वयात गेले बळी 
यापूर्वी २०१६ मध्ये गुड्डू या वाघाचा वयाच्या १२ वर्षी, दीप्ती वाघिणीचा ११ व्या वर्षी, राणीचा मृत्यू १६ व्या तर गीताचा मृत्यू १७ व्या वर्षी झाला होता. करिना ही फक्त सहा वर्षांची होती. वाघांचे सरासरी वय २० वर्षे एवढे आहे. 

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

बछड्यांच्या बळीने उडाली होती खळबळ 
तीन बछड्यांच्या मृत्यूचे प्रकरण २०१६ मध्ये राज्यभर गाजले होते. याप्रकरणी प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना दोषी ठरवून तत्कालीन आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती

go to top