Gram Panchayat Election: पैठण तालुक्यातील हिरडपुरी ग्रामपंचायत बिनविरोध

अनिल गारूड
Tuesday, 5 January 2021

या विजयाचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी जल्लोष करत स्वागत केले.

विहामांडवा (जि.औरंगाबाद) : पैठण तालुक्यातील 11 सदस्य असलेली हिरडपुरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध ठरली आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी इतर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने पैठण तालुक्यात बिनविरोध होण्याचा मान हिरडपुरी ग्रामपंचायतीला मिळाला आहे.  

बिनविरोध झालेले सदस्य
भाग्यश्री तांबे,  भागवत ढोले, अनिता गांधले, पांडुरंग तांभोरे, लिलाबाई तांबे,  आप्पासाहेब हातागळे, नसीर शेख, नीलाबाई कचरे, बबनबाई सातपुते, इस्लाम शेख असे बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांची नावे आहेत. हिरडपुरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पैठण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनोद तांबे यांनी सर्वांना एकत्र केले. व गावच्या विकासासाठी सर्व पक्ष, संघटनांनी एकत्र येऊन एक आदर्श निर्माण केला आहे.

विजेचा शॉक लागून शेतकरी महिलेचा मृत्यू; गेवराई खुर्द येथील घटना

हिरडपुरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनोद तांबे, सुभास गांधले, मुस्ताक शेख, साईनाथ जाधव, गणेश गारुळे यांनी पुढाकार घेतला होता. या विजयाचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी जल्लोष करत स्वागत केले.

(edited by pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Hirdpuri Gram Panchayat in Pathan Taluka unopposed