esakal | कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह; शेतकऱ्यांना सोडला सुटकेचा निःश्‍वास, अलर्ट झोन रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Chicken News

शेतीला जोडधंदा म्हणून कोंबडी पालन करणारे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला असुन जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन गावांच्या दहा किलोमीटर परिघात लागू केलेला अलर्ट झोन रद्द केला आहे.

कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह; शेतकऱ्यांना सोडला सुटकेचा निःश्‍वास, अलर्ट झोन रद्द

sakal_logo
By
ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : पैठण तालुक्यातील अमरापूरवाघुडी येथील जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात दगावलेल्या शेकडो गावरान कोंबड्यांचा पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, भोपाल प्रयोगशाळेस तपासणीस पाठवलेल्या नमुनेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून कोंबडी पालन करणारे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला असुन जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन गावांच्या दहा किलोमीटर परिघात लागू केलेला अलर्ट झोन रद्द केला आहे.

गेल्या आठवड्यात पैठण तालुक्यातील हिरडपूरी व अमरापूरवाघुडी शिवारातील शेतकरी गणेश गरूळे व भाऊसाहेब शिंदे यांच्या शेतातील शेकडो गावरान कोंबडी अज्ञात रोगाने दगावल्याने कोंबडी पालकात खळबळ उडाली होती. दोन दिवसांत शिंदे यांच्या जवळपास एकशे त्रेसष्ट कोंबड्या दगावल्यानंतर पशुसंवर्धन तालुका सर्व लघुचिकित्साचे उपायुक्त शीघ्र  कृती दल समितीचे डॉ.श्रीनिवास भुजंग, डॉ. गौतम साळवे, डॉ. राजेश दांगट, डॉ.विठ्ठल पाबळे यांनी पाहणी करून मृत कोंबडीचे नमुने पुणे येथे पाठवले होते. पुण्याहून हे नमुने राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, भोपाल (मध्य प्रदेश) या प्रयोगशाळेत तपासणी झाले असून त्याच्या अहवाल बर्ड फ्लूसाठी निगेटिव्ह आला आहे.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

त्यामुळे प्राण्यातील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक अधिनियम २००९ नुसार या गावाच्या दहा किलोमीटर परिसरातील सतर्क क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ता.१६ जानेवारी रोजी जाहीर केलेले क्षेत्र आता कोंबड्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने व त्या परिसरातील कोंबड्या पुन्हा दगावल्या नसल्याने अमरापूरवाघुडी, हिरडपुरी गाव परिसर जाहीर अलर्ट झोन जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगित केला आहे. त्यामुळे कोंबडी पालक व चिकण अंडी खाणारे ग्राहकांच्या मनातील बर्ड फ्लू संसर्गाची भीती दुर होणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर

go to top