भाजी विक्रेत्यांमध्ये ठेवा पाच मीटरचे अंतर

प्रकाश बनकर
शनिवार, 28 मार्च 2020

बाजार समितीच्या भाजीमंडईत शनिवारी सकाळी पोलिस आयुक्तांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीने काय काय उपाययोजना केल्या याची पाहणी करण्यात आली. मोकळ्या जागेचा वापर भाजीमंडईसाठी करा, अशा सूचनाही आयुक्तांनी समितीला दिल्या.

औरंगाबाद : बाजार समितीमधील भाजीमंडईत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करा. भाजीविक्रेत्यांमध्ये पाच मीटरचे अंतर ठेवा, मोकळ्या जागेचा वापर गर्दी कमी करण्यासाठी करा, अशा सूचना पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बाजार समिती प्रशासनाला शनिवारी (ता.२८) दिल्या.

 
बाजार समितीच्या भाजीमंडईत शनिवारी सकाळी पोलिस आयुक्तांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीने काय काय उपाययोजना केल्या याची पाहणी करण्यात आली. मोकळ्या जागेचा वापर भाजीमंडईसाठी करा, अशा सूचनाही आयुक्तांनी समितीला दिल्या. बाजार समितीत नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रोडवरील स्ट्रीट लाइट सुरू करा यासाठी आम्ही परवानगी देऊ, असेही आयुक्तांनी समितीला सांगितले.

पोलिस आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार बाजार समिती ही उपाययोजना पूर्वीपासून करीत आहे. आता पुन्हा गर्दी कमी करण्यासाठी समितीतर्फे पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. आजपासूनच ही टीम कार्यरत असल्याची माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

टीम अशा करतील काम 

  • पहिली टीम : जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी काम करेल. 
  • दुसरी टीम : फळे-भाजीपाला मार्केटमध्ये रस्त्यावर गाड्या उभ्या राहणार नाहीत यासाठी 
  • कार्यरत राहील व गाड्या उभ्या राहू देणार नाही. 
  • तिसरी टीम : फळे-भाजीपाला मार्केटमध्ये व्यापारी - शेतकरी यांच्यामध्ये पाच फुटांचे अंतर न ठेवणाऱ्यांवर कारवाई करेल. 
  • चौथी टीम : भाजीपाला मार्केटमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेत व गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करेल. 
  • पाचवी टीम : भाजीपाला मार्केटमध्ये माइकवरून सर्वांना कोरोनाबद्दल जनजागृती करेल. 

 

बाजार समितीत आज पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी भेट दिली. काही सूचनाही केल्या. त्यांचे पालन करीत आहोत. यासह आम्ही पाच टीम करून गर्दी कमी करण्याचे काम सुरू केले. एकूण २५ जणांची टीम काम करणार आहे. 
- राधाकिसन पठाडे, सभापती, बाजार समिती 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Market control in coroana