esakal | औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : वॉर्ड झाला इच्छुकांच्या सोयीचा 
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : वॉर्ड झाला इच्छुकांच्या सोयीचा 

मागील निवडणुकीत संजयनगर-खासगेट वॉर्ड क्रमांक 56 आणि संजयनगर वॉर्ड क्रमांक 57 असे होते. आता नवीन रचनेत हा वॉर्ड संजयनगर-खासगेट असा झाला. या वॉर्डात खासगेट, बायजीपुरा, संजयनगर, गंजे शहिदा कब्रस्तानपर्यंतचा भाग घेण्यात आला आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : वॉर्ड झाला इच्छुकांच्या सोयीचा 

sakal_logo
By
शेखलाल शेख

वॉर्ड क्रमांक 57 : संजयनगर-खासगेट 

मागील निवडणुकीत संजयनगर-खासगेट वॉर्ड क्रमांक 56 आणि संजयनगर वॉर्ड क्रमांक 57 असे होते. आता नवीन रचनेत हा वॉर्ड संजयनगर-खासगेट असा झाला. या वॉर्डात खासगेट, बायजीपुरा, संजयनगर, गंजे शहिदा कब्रस्तानपर्यंतचा भाग घेण्यात आला आहे.

मुस्लिमबहुल असलेला वॉर्ड सर्वसाधारणसाठी सुटल्याने येथे इच्छुकांच्या उड्या तर पडल्या, शिवाय हा वॉर्ड त्यांना सोयीचा झाला आहे. मागील निवडणुकीत संजयनगर-खासगेट वॉर्डात एमआयएमचे तर संजयनगर वॉर्डात कॉंग्रेसचे वर्चस्व होते. आताही येथे कॉंग्रेस-एमआयएम अशी लढत होण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा : कोणाच्या"कृपे'ने औरंगाबाद शहराचा झाला कचरा

अशी आहे रचना 

उत्तर भाग हा राम टी हाऊसपासून खासगेट ते नदवी चौक ते गंजे शहिदा कब्रस्तानपर्यंत. पूर्व भाग हा नदवी चौक ते गंजे शहिदा कब्रस्तान संरक्षित भिंतमार्गे काजीवाडा ते आरेफ किराणा चावडीमार्गे मोईनभाई यांचे घर ते जफर खान यांच्या घरापासून शरीफ किराणा ते डायमंड आर्ट डेकोरेटर्स ते भारत ट्रेडिंगसमोरील गल्ली नंबर सी-10 मार्गे गंगा हॉस्पिटलपर्यंत. दक्षिण भाग हा गंगा हॉस्पिटलपासून स्नेहल इंटरप्राईजेस ते कैलासनगर स्मशानभूमी रोडमार्गे पूजा मिठाई ते बाबूराव देवकर यांच्या घरापर्यंत. पश्‍चिम भाग हा बाबूराव देवकर यांच्या घरापासून एम्पोरियम स्टोअर ते सय्यद चाऊस यांच्या घरापासून मेहराज मंजीलपासून पूर्वेस शेख रशीद यांच्या घरापासून उत्तरेस पॉवर हाऊस जिन्सी ते राम टी हाऊस जिन्सी पोलिस स्टेशनसमोर.

क्लिक करा : मंदी संपताच बजाज ऑटोचा होणार विस्तार

असा आहे वॉर्ड 

लोकसंख्या- 10,682 
अनुसूचित जाती- 223 
अनुसूचित जमाती- 23 


वॉर्डात रस्ते चांगले झाले आहेत. पाण्याची इतकी जास्त समस्या येथे दिसत नाही; मात्र जी कामे आता बाकी आहेत ती तातडीने पूर्ण व्हावीत, हीच अपेक्षा आहे. 
- सय्यद जुबेर 

वॉर्डात एक महापालिकेचा दवाखाना होणे आवश्‍यक आहे. या भागात बहुतांश नागरिक मध्यमवर्गीय, गरीब आहेत. वॉर्ड कसा तुटला यापेक्षा आम्हाला येथील कामे होणे महत्त्वाचे आहे. 
- शेख जाकेर