एकत्र नाही लढलो तर स्वबळाची तयारी 

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठीचे वॉर्डांचे आरक्षण जाहीर होताच सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असल्याने महापालिका निवडणुका कशा लढल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एकत्र नाही लढलो तर 75 जागेवर राष्ट्रवादीची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले. 

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळावर 70 जागा लढल्या होत्या. मात्र, केवळ 4 उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीचे शहरात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. मात्र, ऐन निवडणुकीत गटबाजी उफाळून येते. त्यामुळेच उमेदवारांना पराभव पत्कारावा लागतो, हे आतापर्यंत घडत आलेले आहे.

आगामी महापालिका निवडणूक ही महाविकास आघाडीने एकत्रितच लढावी, असे कार्यकर्त्यांना वाटते. पक्षातील वरिष्ठांकडूनही तसे संकेत मिळत असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, एकत्र नाही लढलो तर स्वबळावर 75 वॉर्डांमध्ये उमेदवार देणार, असा दावा केला जात आहे.  

आम्ही कामाला लागलो 
महाविकास आघाडीने एकत्र लढावे, असे वाटते. त्यासाठी 30 ते 32 जागा आम्हाला मिळाव्यात. तसे आमचे 35 ते 40 उमेदवार तयार आहेत. त्यादृष्टीने 65 वॉर्डांत बैठका घेतल्या. 40 वॉर्डांच्या बूथ कमिट्याही तयार आहेत. केवळ वरिष्ठाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. सध्या एमआयएमचे दोन आणि कॉंग्रेसच्या एका नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केलेला असून, अजून अनेक जण वाटेवर आहेत. 
- विजय साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com