त्या महिलेचा बळी गेला अन् ४८ तासानंतर काय घडले...

amc aurangabad
amc aurangabad

औरंगाबाद- जालना रोडवर पोलवरून लटकलेल्या केबलमुळे बळी गेल्यानंतर महापालिकेला तब्बल 48 तासांनंतर जाग आली आहे. सोमवारी (ता. 20) आयुक्त आस्तिककुमार पांडेय रस्त्यावर उतरले. जकात नाका परिसरात पाहणी करीत त्यांनी महापालिकेचे सर्व केबल भूमिगत करण्यात यावेत तसेच शहरातील पोलवर टाकण्यात आलेले बेकायदा केबल कापण्याची मोहीम तीव्र करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. येत्या आठ-दहा दिवसांत संपूर्ण शहरभर कारवाई करण्याची तयारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

शहरातील मुख्य रस्त्यांवरून लटकणाऱ्या केबलाचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. अशा केबल गळ्यात अडकून अनेक अपघात झाले. त्यात काहींना दुखापती झाल्या तर काहींना अपंगत्व आले. याची दखल घेत न्यायालयाने बेकायदा केबल काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत दोन वेळा महापालिकेने मोहीम राबविली; मात्र कारवाई करून महापालिकेचे पथक माघारी फिरताच दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यात भागात केबल टाकली जातात. शनिवारी जालना रोडवर एका महिलेचा बळी गेला. केबलला अडकून रस्त्यावर पडलेल्या या महिलेला वाहनाने चिरडले.

या घटनेनंतर महापालिका प्रशासनाला 48 तासानंतर जाग आली आहे. सोमवारी दुपारी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी जकातनाका परिसरात पाहणी केली. यावेळी त्यांना अनेक पोलवर लटकलेले केबल आढळून आले. त्यानुसार तातडीने कारवाई सुरू करा, मोहीम तीव्र करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. शहर अभियंता सखाराम पानझडे, विद्युत विभागाचे प्रमुख ए. बी. देशमुख, उपअभियंता के. डी. देशमुख, वॉर्ड अधिकारी सी. एम. अभंग, वॉर्ड अभियंता श्री. भोये यांची यावेळी उपस्थिती होती. 

महापालिकेचे केबल होणार भूमिगत 
महापालिकेचे शहरात सुमारे 50 ते 50 हजार पथदिव्यांचे खांब आहेत. या पथदिव्यांना अनेक ठिकाणी केबल उघड्या आहेत. या केबल भूमिगत करण्याचे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले आहेत. त्यानुसार मंगळवारपासून (ता. 21) मोहीम सुरू करण्याची तयारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com