महापालिकेला मिळेना रस्ते कामासाठी कंत्राटदार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

कंत्राटदार निविदा भरण्यास तयार नसल्याने महापालिकेची कोंडी झाली आहे. नऊ पैकी चार कामांच्या निविदा तिसऱ्यांदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. १६ एप्रिल निविदा भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. 

औरंगाबाद : शहरातील ९ रस्त्यांची कामे करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ४१ कोटी रुपयांचा निधी दिला असून, सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र कंत्राटदार निविदा भरण्यास तयार नसल्याने महापालिकेची कोंडी झाली आहे. नऊ पैकी चार कामांच्या निविदा तिसऱ्यांदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. १६ एप्रिल निविदा भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. 

शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारने १५२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातून सुमारे २५ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. मात्र ही कामे औद्योगिक विकास महामंडळ, महापालिका व रस्ते विकास महामंडळाला विभागून देण्यात आली आहेत. त्यानुसार तीनही विभागांनी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. महापालिकेने ४१ कोटींच्या नऊ रस्ते कामांच्या निविदा काढल्या होत्या.

त्या निविदा स्वीकारण्याची अंतिम मुदत नऊ मार्च होती. मात्र, या मुदतीत अत्यल्प प्रतिसाद मिळाला. नऊपैकी केवळ दोनच कामांसाठी प्रत्येकी तीन निविदा आल्या आहेत. उर्वरित कामांपैकी ३ कामांसाठी दोन दोन तर चार कामांसाठी केवळ एकेकच निविदा आली आहे. त्यामुळे सात कामांच्या फेरनिविदा काढण्यात आल्या. दुसऱ्यांदा तीन कामांना प्रतिसाद मिळाला. मात्र उर्वरित चार कामांच्या निविदा कंत्राटदारांनी भरलेल्या नसल्यामुळे मंगळवारी (ता. सात) या चार कामांसाठी तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 
एमआयडीसी, एमएसआरडीसीच्या निविदा अंतिम 
महापालिकेप्रमाणेच औद्योगिक विकास मंडळाने ४१ कोटींच्या आणि रस्ते विकास महामंडळाने ५२ कोटींच्या कामांच्या निविदा काढल्या होत्या. पहिल्याचवेळी त्यांच्या निविदांना प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या कामांच्या निविदा अंतिम टप्प्यात आहेत. महापालिकेने मात्र निविदांसाठी जास्तीच्या अटी टाकल्यामुळे प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे. 
 
ही आहेत कामे (कंसात किंमत) 
-वोक्खार्ड ते जयभवानी चौक, नारेगाव रस्त्याचे डांबरीकरण करणे व रेल्वेस्टेशन ते तिरूपती एन्क्लेव्ह येथील रस्त्याचे पुनर्डांबरिकरण करणे करणे. (८, २८,८४,७०३) 
-दिपाली हॉटेल ते जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यांचे कॉंक्रेटीकरण करणे व रेल्वेस्टेशन जवळील उड्डाणपुलावर डांबरीकरण करणे. (१५,०२,९१,८२५) 
-अग्रेसन चौक ते सेंट्रल एक्साईज ऑफिस रस्त्याचे डांबरीकरण करणे. (२,७८,५५,५७१) 
-जळगाव रोड ते हॉटेल अजंता अॅम्बेसेडर रस्त्याचे डांबरीकरण करणे (१,५२,९५,३९६) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal News