महापालिका संकटात आणि यांनी घेतली २१ लाखांची कार

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद : महापालिका डबघाईला आलेली असताना वाहन खरेदीवर लाखो रुपयांच्या उधळपट्टीचा प्रकार सुरूच आहे. गतवर्षी पदाधिकाऱ्यांनी तब्बल ५० लाख रुपये खर्च करून वाहने खरेदी केली होती. त्यात आता तत्कालीन आयुक्त व विद्यमान प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्यासाठी २१ लाख रुपयांची इनोव्हा कार खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारीत ही कार खरेदी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापालिकेत शासनाकडून जीएसटीच्या रूपाने मिळणारे अनुदान सोडले तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचेदेखील वांदे आहेत. त्यामुळे अधून-मधून खर्च कमी करण्याचे वारे महापालिकेत वाहतात. मात्र हे आदेश कागदावरच राहतात. गेल्या वर्षी महापौर, उपमहापौर व आयुक्तांसाठी अशी तीन वाहने खरेदी करण्यात आली होती. त्यावर सुमारे ५० लाख रुपये खर्च झाला होता. दरम्यान, अधिकाऱ्यांसाठी असलेली वाहने जुनी झाल्यामुळे दीड कोटी रुपये खर्च करून नवी २३ वाहने खरेदी करण्याचा ठरावही सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. 

या निर्णयावर टीका होताच अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने वाहने खरेदी करावीत, महापालिका कर्जासाठी हमीपत्र देईल, असा निर्णय घेण्यात आला. हा विषय थंड बस्त्यात असताना आता आयुक्तांसाठी २१ लाख रुपयांची इनोव्हा कार खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कार फेब्रुवारी महिन्यात खरेदी करण्यात आली आहे. मात्र कारचा वापर सुरू नसल्याने माहिती समोर आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

पैसा महापालिकेचा, नाव शासनाचे 
महापालिकेच्या पैशातून ही कार खरेदी करण्यात आली आहे. मात्र त्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर आला नाही. २५ लाखांपर्यंतचा निधी खर्च करण्याचे अधिकार प्रशासनाला असल्यामुळे हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या कारवर ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिण्यात आल्यामुळे सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. 

अग्निशमनच्या वाहनाचा गैरवापर सुरूच 
अत्यावश्‍यक सेवा म्हणून अग्निशमन विभागाच्या वाहनांवर अंबर दिव्याची परवानगी आहे. अग्निशमन विभागासाठी यापूर्वीच इनोव्हा कार खरेदी करण्यात आली होती. हीच कार यापूर्वीच्या काही आयुक्तांनी वापरली. दरम्यान, उपायुक्त असलेले अग्निशमन विभागाचे प्रमुखदेखील हीच कार वापरतात. या कारचा अपघात झाल्यानंतर गैरवापर सुरू असल्याचे समोर आले होते. आता ही कार कोरोनासाठी नियुक्त अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे समोर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com