
औरंगाबाद : औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदी महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक असलेले सुनील चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर औरंगाबादला कोण येणार याची चर्चा सुरु होती. सोमवारी (ता. १७) या चर्चोला पुर्णविराम मिळाला.
पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं
जिल्हाधिकारी उदय चौधरी हे दोन वर्षापुर्वी औरंगाबादला रुजू झाले होते. तत्कालिन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला होता. कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी चौधरी हे अधिक फोकसमध्ये आले होते. उदय चौधरी यांची सोमवारी (ता. दहा) मंत्रालयात बदली झाली.
राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा
त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्याकडे पदभार सोपवला होता. तेंव्हापासून जिल्हाधिकारी पदी कुणाची नियुक्ती होते, याबद्दल चर्चा करण्यात येत होती. अखेर त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबाद महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांची वर्णी लावण्यात आली. सुनिल चव्हाण हे ३ एप्रिल २०२० रोजी महावितरणच्या सेवेत रुजु झाले होते. अवघ्या तीन महिन्यात त्यांची महावितरणमधून औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा...
मराठवाड्याचे सुपुत्र
मराठवाडयाचे भूमीपुत्र असलेले सुनील चव्हाण हे २००७ च्या आयपीएस बँचचे अधिकारी आहे. त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून एम.एसस्सी. कृषी-मृदा आणि व्यवस्थापन या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. यापुर्वी त्यांनी मंत्रालयात मुंबई येथे उपसचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी ठाणे महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून साडे तीन वर्ष काम पाहिले आहे. ठाणे महापालिकेत स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करतांना ५५०० कोटी रूपयांचा अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करून १५० पेक्षा जास्त योजना राबविल्या. तसेच अतिरिक्त आयुक्त म्हणून १८००० पेक्षा जास्त बेकादेशीर व अवैध बांधकामांवर कार्यवाही केली होती त्यामुळे धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.
(संपादन-प्रताप अवचार)