मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा...

युवराज धोतरे 
Tuesday, 4 August 2020

रविवारी रात्री साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी पीपीई किट परिधान करून कोरोना वार्डात दाखल झाल्याने आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडाली. तर रुग्णांना मात्र समाधान वाटले.

उदगीर (जि.लातुर) : लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी रविवारी (ता.२) रात्री साडेअकरा वाजता येथील कोवीड रुग्णालयास अचानक भेट देऊन कोरोना बाधित रुग्णाशी संवाद साधत पाहणी केली आहे.
रविवारी रात्री साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी पीपीई किट परिधान करून कोरोना वार्डात दाखल झाल्याने आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडाली. तर रुग्णांना मात्र समाधान वाटले.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...  

शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.दररोज नवीन रुग्ण वार्डात दाखल होत आहेत. या रुग्णांना शासनाच्या वतीने मोफत  जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी नाष्टा व दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे. मात्र या रुग्णांना पिण्याचे पाणी, जेवणाची क्वालिटी, आणी ऑक्सिजचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पीपीई किट परिधान करून उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला.
कोरोना वार्डातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संवाद साधून तेथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. ज्या ज्या काही बाबी त्या ठिकाणी आढळल्या त्यासंदर्भात आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगेशेट्टी, कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे आदी उपस्थित होते.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

कोरोना रुग्णांची आस्थेवाईक चौकशी
जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री साडेअकरा ते दीड वाजेपर्यंत प्रत्येक वार्ड मधिल रुग्णाची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.रुग्णालयात चालू असलेल्या सर्वं व्यवस्था, रुग्ण तपासणी नोंदी, स्वच्छता, रुग्णालयातील डॉक्टर व इतर टिम यांची स्थिती, नेमून दिलेल्या ड्युटी, स्वॅब घेण्याचे असलेले नियोजन, हेल्प डेस्क या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  District Collector entry to covid ward