गरजूंना सहा टन डाळ, तांदूळ वाटप

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 5 एप्रिल 2020

पाच किलो तांदूळ आणि एक किलो तूर डाळीचे पॅक धान्य प्रत्येक कुटुंबांना देण्यात आले. अशा एक हजार कुटुंबांना धान्य चार दिवसांत वाटप करण्यात आले. 

औरंगाबाद - संचारबंदीमुळे हातावरचे पोट असणाऱ्यांच्या वसाहतींमध्ये गरजूंच्या घरी जाऊन सिंजेंटा आणि जनजागृती प्रतिष्ठानकडून सहा टन तांदूळ आणि तूर डाळीचे वाटप केले. पाच किलो तांदूळ आणि एक किलो तूर डाळीचे पॅक धान्य प्रत्येक कुटुंबांना देण्यात आले. अशा एक हजार कुटुंबांना धान्य चार दिवसांत वाटप करण्यात आले. 

गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांच्या पुढाकाराने सिंजेंटा कंपनीचे पी. एस. जगदिशा, जनजागृती प्रतिष्ठानचे सचिव विकास कापसे, विलास कापसे यांच्याशी चर्चा करून सिंजेंटा इंडिया लिमिटेड यांच्या मदतीने एक हजार कुटुंबांचा किमान आठवडाभर तरी प्रश्न मिटावा यासाठी नियोजन केले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंसेवकांना जाण्यासाठी खास पोलिस आयुक्तांकडून परवानगी घेऊन आंबेडकरनगर, मिसारवाडी, पूनमनगर, राधास्वामी कॉलनी, अंबर हिल, स्वराज्यनगर, जयभवानीनगर, विश्रांतीनगर, शिवशाहीनगर, वाळूज, प्रतापनगर, मोहटादेवी चौक, एकतानगर या भागात गरजू कुटुंबांचा सर्व्हे करून त्यांना घरपोच धान्य वाटप करण्यात आले. वाटप करताना स्वयंसेवकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्स ठेवून वाटप करण्यात आले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

या मोहिमेसाठी जनजागृती प्रतिष्ठानचे सचिव विकास कापसे, विलास कापसे, हरी म्हस्के, नीतेश कुबेर, परमेश्‍वर दौड, अजय दुधे, पांडुरंग ठोंबरे, इमारत बांधकाम कामगार संघटना व भाकपचे राज्य उपाध्यक्ष मधुकर खिल्लारे, वसुधा कल्याणकर, सुधाकर खिल्लारे, सुरेश ठोंबरे, संदीप अंबिलढगे, सीमा खिल्लारे, संजय अंभोरे, विशाल नरवडे, गणेश सूर्यवंशी, लखन खिल्लारे, नवसाजी हणमंते यांनी पुढाकार घेतला.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News About Grocery Supply In Coronavirus Lockdown Period