esakal | जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न, सर्वपक्ष येणार एकत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad District Cooperative Bank

निवडणुकीची प्रथम यादी प्रसिद्ध झाली असून, यावर हरकती मागविण्यात येत आहेत.

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न, सर्वपक्ष येणार एकत्र

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. २७ जानेवारीला यासाठीची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहेत. असे असले तरी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सर्व संचालकाचा प्रयत्न आहे. बुधवारी (ता. २१) झालेल्या संचालकांच्या बैठकीतही असाच काहीसा सूर दिसून आला. यात सर्वपक्षीय लोक एकत्र येत यावर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हृदयविकाराच्या झटक्याने जवानास वीरमरण, देशसेवेसाठी सेवाकाळ घेतला होता वाढवून

निवडणुकीची प्रथम यादी प्रसिद्ध झाली असून, यावर हरकती मागविण्यात येत आहेत. येत्या २७ जानेवारीला अंतिम यादी जाहीर होणार आहेत. त्यांच्या आठ दिवसांनंतर निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहेत. काल झालेल्या बैठकी ही या संचालक मंडळाची अंतिम बैठक ठरली आहेत. यात सर्व मतभेद बाजूला ठेवत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय संचालकांकडून करण्यात आला आहे. त्याच दृष्टीने येत्या आठवडाभरात चर्चा होऊन याविषयी निर्णय होणार आहेत. चर्चाच्या दृष्टीने हलचालीही सुरु झाल्या आहेत. यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही वर्तविल्या जात आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

Edited - Ganesh Pitekar