गेब्स फाउंडेशनमुळे गरजूंच्या चेहरे फुलले 

GEBBS
GEBBS
Updated on

औरंगाबाद ः गेब्स फाउंडेशनतर्फे गरजू व्यक्तींना फूड रिलीफ किटचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळात फाउंडेशनचा आधार मिळाल्याने या गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

फाउंडेशनतर्फे चोवीस किलो वजनाच्या दीडशे फूड रिलीफ किटचे वाटप करण्यात आले असून, आणखी मदत गरजूंसाठी करण्यात येणार आहे. 

गेब्स फाउंडेशन संस्था तीन वर्षांपासून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात काम करते. आरोग्यविषयक सामाजिक कार्यात खासकरून महिलांचे गर्भाशय, ब्रेस्ट कॅन्सर निदानासाठी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात हे फाउंडेशन काम करीत आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने असंख्य होतकरू व गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. यासाठीच त्यांना मदत म्हणून गेब्स फाउंडेशनचे अध्यक्ष विजय ठाकूर आणि संचालिका अंजू गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली हालाखीच्या स्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

शहरातील संजयनगर, मुकुंदवाडी, छावणी, मिलिंदनगर, शहाशोक्त कॉलनी, संजयनगर बायजीपुरा, न्यू हनुमाननगर, रामनगर, रोशनगेट आदी भागात २४ किलो वजनाच्या फूड रिलीफ किटचे वाटप गेब्स फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक गणेश मते, अमर धावरे, घनश्याम मते, भीमराव बनसोड यांनी केले. पुढच्या टप्प्यात आणखी फूड रिलीफ किट वाटप करण्यात येणार आहेत.

मास्कचेही वितरण करण्यात येणार असून, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या इतर ठिकाणच्या चारशे लोकांच्या मदतीसाठी ही संस्था पुढाकार घेणार आहे.  

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com