
शेतात असलेल्या पिकाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या आगीमध्ये संपूर्ण ऊस व मोसंबीची 330 झाडे व पाईप लाईन, ठिंबक जळुन खाक झाले होते.
आडुळ (औरंगाबाद): भालगाव येथील महिला शेतकरी दगडाबाई बाबुराव डोईफोडे व रामेश्वर बाबुराव डोईफोडे यांची भालगाव शिवारातील गट क्रमांक 273 मध्ये प्रत्येकी दोन एकर शेती असुन दोन एकर ऊस व दोन एकर मध्ये मोसंबीची 400 झाडांची बाग होती. या जमिनीच्या बांधावरून विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांच्या तारा गेलेल्या आहेत.
तारांना झोळ पडल्याने मागील वर्षी वादळी वाऱ्यामुळे खांबावरील विद्युत तारात घर्षण होऊन आगीचे गोळे शेतात पडले होते. यामुळे शेतात असलेल्या पिकाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या आगीमध्ये संपूर्ण ऊस व मोसंबीची 330 झाडे व पाईप लाईन, ठिंबक जळुन खाक झाले होते. विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
दख्खनच्या ताज महालासमोरील रस्ता वादाच्या भोवऱ्यात; भारतीय पुरातत्व विभाग, लोकप्रतिनिधी आमने-सामने
त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. परंतु मागणी करून सुद्धा नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग औरंगाबाद यांच्याकडे नुकसान भरपाई मिळावी यासाठी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन मा. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग औरंगाबादच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्य किरण ठोले यांनी दोन्ही शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले. नंतर अधिक्षक अभियंता, ग्रामीण मंडळ व कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. औरंगाबाद यांना दगडाबाई डोईफोडे यांचे ऊस जळीत नुकसान भरपाई पोटी 408000 रुपये व रामेश्वर डोईफोडे यांचे मोसंबी झाडे जळीत नुकसान भरपाई पोटी 78,59610 रुपये व मानसिक त्रासापोटी प्रत्येकी 20,000 रुपये अशी एकूण 83,07,610 रुपयांची नुकसान भरपाई तीस दिवसांत देण्याचे आदेश दिले.
(edited by- pramod sarawale)