esakal | चक्क चोर झाला पोलिस! भरदिवसा दुचाकीस्वाराला थांबवून लुटलं
sakal

बोलून बातमी शोधा

pachod

अज्ञात चोरट्यांनी पाचोड येथे त्यांच्यावर पाळत ठेवली, अन् जसे भगवान गायकवाड दुचाकीने पुढे निघाले, तसे 'ते' अज्ञात चोरटेही दुचाकीने त्यांच्या मागे दुचाकीचा पाठलाग करु लागले

चक्क चोर झाला पोलिस! भरदिवसा दुचाकीस्वाराला थांबवून लुटलं

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद): स्वतःच्या दुचाकीने पैठण येथे लग्नाला जाणाऱ्या इसमास चार किलोमिटर पाठलाग करून दोन दुचाकीस्वारांनी त्यास पोलिस असल्याचं सागून लुटलं आहे. त्यामध्ये अंगावरील सोन्याची अंगठी चोरून नेल्याची घटना गुरुवारी ( ता. चार) भरदिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाचोड - पैठण रस्त्यावर थेरगाव जवळ घडली.

अधिक माहिती अशी, भगवान गणपतराव गायकवाड( वय  ६० वर्ष), रा. बारसवाडा (ता अंबड), जि. जालना हे अंकुशनगर येथील समर्थ सहकारी साखर कारखान्यावर नोकरीला होते. ते नुकतेच निवृत्त झाले असून ते गुरुवारी (ता. चार) गावातील मित्राच्या मुलाचे पैठण येथे लग्न असल्याने सकाळी ते दुचाकी (क्रमांक - एम.एच .२१ डि.सी. ६९८४) ने निघाले. ते काही काळ पाचोड येथे चहापाण्यासाठी थांबा घेऊन पुढील प्रवासाला निघाले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी पाचोड येथे त्यांच्यावर पाळत ठेवली, अन् जसे भगवान गायकवाड दुचाकीने पुढे निघाले, तसे 'ते' अज्ञात चोरटेही दुचाकीने त्यांच्या मागे दुचाकीचा पाठलाग करु लागले.

धक्कादायक! पुरावा नष्ट करण्यासाठी उकिरड्यावर फेकून दिलं अर्भक; पोलिसांचा...

थेरगाव (ता पैठण) जवळ त्यांनी भगवान गायकवाड यास एक किलोमिटरपासून आम्ही हॉर्न देतो, तुम्हास समजत नाही का? असे दम देण्यास सुरवात केली. तेव्हा भगवान गायकवाड यांनी मी काय केले, आपण कोण आहात ? असे सांगताच त्यांनी  तुमच्या खिशातील चरस - गांजा काढा असे सांगून पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवून दमबाजी करीत दुचाकी थांबवली. गायकवाड यांच्या गळ्यातील रूमाल हिसकावून अंगाची झडती घेतली व खिशातील पाकीट, पेन, आधार कार्ड, हातातील १० ग्राम सोन्याची अंगठी काढुन घेऊन रुमालात बांधले, दरम्यान त्यांनी अंगठी व आधार कार्ड घेऊन उर्वरित साहीत्य गायकवाड यांच्या खिशात कोंबून पोबारा केला.

घाबरलेल्या अवस्थेत श्री. गायकवाड यांनी थेरगाव बसस्थानक गाठुन तेथील हॉटेलवरील नागरिकांना माहीती देऊन मदतीची मागणी केली, मात्र त्यांना कुणीच मदत न केल्याने पाचोड पोलिस ठाणे गाठून पोलिसांसमोर आपली कैफियत मांडली. सबंधित संशयिताच्या अंगात खाकी पॅन्टस व अंगात जॅकेट परिधान केलेले होते. एक जाड, गोरा, उंच धिप्पाड तर दुसरा व्यक्ती काळा सावळा, उंची कमी असलेला व्यक्ती होता, असे वर्णन श्री. गायकवाड यांनी सांगितले.

पाचोड आत्महत्या प्रकरण; नातेवाईकांनी गुन्हा दाखल होईपर्यंत दफनविधी रोखला

ही माहीती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी तातडीने सहकाऱ्या समवेत घटनास्थळी भेट देऊन सर्वत्र संशयीताचा शोध घेतला. मात्र तोपर्यंत संशयित पसार होण्यास यशस्वी झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे व त्यांचे सहकारी संशयीताचा शोध घेत असुन त्यांना तातडीने गजाआड करण्यास पोलिसांना यश मिळेल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले.

(edited by- pramod sarawale)