
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भगवान हरिदास महालकर (वय ३५, रा. खांडी पिंपळगाव, ता. खुलताबाद) हा चार दिवसांच्या पोलिस कोठडीत होता.
पिशोर (जि.औरंगाबाद) : पिशोर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अटक असलेल्या आरोपीने शौचालयात सफाईसाठी असलेले रसायन सेवन केल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणी रविवारी (ता.२४) एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भगवान हरिदास महालकर (वय ३५, रा. खांडी पिंपळगाव, ता. खुलताबाद) हा चार दिवसांच्या पोलिस कोठडीत होता.
धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया,‘मी राजकीय भांडवल केले नसते’
शुक्रवारी (ता.२२) सकाळी साडेसात वाजेदरम्यान शौचास जाण्यासाठी म्हणून त्याला पोलिस ठाण्याच्या आवारातील शौचालयात नेण्यात आले होते. शौचालयात त्याने रसायन सेवन केले होते. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने महालकर याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान भगवान महालकर याचा शनिवारी (ता.२३) मृत्यू झाला.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा
या प्रकरणी रविवारी सीआयडीच्या पोलिस अधीक्षक कड यांनी पिशोर पोलिस ठाण्यात येऊन या प्रकरणी तपास केला. कर्तव्यावर असलेले गार्ड एस.के.पठाण यांच्यावर ठपका ठेवून या प्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी सांगितले.
संपादन - गणेश पिटेकर