esakal | महिला दिनी पैठण - औंरगाबाद रस्त्याने घेतला महिलेचा बळी

बोलून बातमी शोधा

Paithan Accident News}

 एमआयडीसी पैठण पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

महिला दिनी पैठण - औंरगाबाद रस्त्याने घेतला महिलेचा बळी
sakal_logo
By
गजानन आवारे

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : जागतिक महिला दिनी पैठण-औरंगाबाद रस्त्याने धनगावजवळ एका महिलेचा बळी घेतला असून सोमवारी (ता.आठ) दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रेखा यंशवत पाटील (वय ४२ रा.पन्नालालनगर पैठण) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रेखा पाटील या पतीसोबत औंरगाबाद येथून पैठणकडे जात असताना पैठण-औंरगाबाद मुख्य रस्त्यावरील धनगाव फाट्याजवळ खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळल्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या.

पुण्याहून गावाकडे आईला भेटायला चाललेल्या मुलाचा भीषण अपघातात मृत्यू

यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. एमआयडीसी पैठण पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून रेखा यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, पोलिस जमादार दिनेश दाभाडे, तुकाराम मारकळ, शरद पवार, राजेंद्र जिवडे हे करीत आहेत.


रस्त्याचे चौपदरीकरण केव्हा
पैठण-औंरगाबाद रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत तर काही रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून हे खड्डे कधी बुजवणार तसेच रस्त्याचे केव्हा चौपदरीकरण होणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


संपादन - गणेश पिटेकर