esakal | औरंगाबाद-पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम होणार लवकर पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

0Train1_11

खूप वर्षांपासून मागणी असलेल्या औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वेप्रशासनाकडून सकारात्मक पाऊल टाकल्याचे दिसत असून त्याच्या कामाला मंजूर मिळाली आहे.

औरंगाबाद-पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम होणार लवकर पूर्ण

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : खूप वर्षांपासून मागणी असलेल्या औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वेप्रशासनाकडून सकारात्मक पाऊल टाकल्याचे दिसत असून त्याच्या कामाला मंजूर मिळाली आहे. दिवाळी नंतर सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. महाराष्ट्र रेल पायाभूत विकास महामंडळातर्फे(एमआरआयडीसी) हे काम केले जाणार आहे. एमआरआयडीसी महाराष्ट्र शासन व रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम आहे.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या दोन मार्गाचाही डीपीआर तयार करून मंजुरीसाठी रेल्वे मंडळ आणि राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

भाजपचे जयसिंगराव गायकवाड यांचा पदवीधरसाठी अर्ज दाखल, बोराळकरांसमोर आवाहन?

मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांना एमआरआयडीसीने एका पत्राद्वारे ही माहिती दिली. रोटेगाव-कोपरगाव या मार्गाची २५ वर्षांपासून प्रतीक्षा केली जात आहे. पूर्वी रोटगाव-पुणतांबा या मार्गाची मागणी केली जात होती. परंतु, या मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे रोटेगाव-कोपरगाव अशा ३५ किलोमीटर मार्गाचा पर्याय मांडण्यात आला. त्यास मंजुरीही मिळाली. परंतु, हा मार्ग सर्वेक्षणाच्या पुढे जात नसल्याची स्थिती आहे.

औरंगाबाद-चाळीसगाव मार्गाचीही प्रतीक्षा करावी लागत आहे. औरंगाबाद-पुणे रेल्वे मार्ग झाल्यास कमी वेळेत प्रवास करणे शक्य होईल. सर्वेक्षणातच हा मार्ग शक्य आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एका वृत्तपत्राला बोलताना म्हणाले, राज्य व केंद्र या दोघांचा समान वाटा नवीन रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी असेल.

मृत्युदराची पुन्हा उसळी, औरंगाबादेत दोन लाख ६४ हजार कोरोना चाचण्या निगेटिव्ह

संपादन - गणेश पिटेकर

go to top