esakal | भाजपचे जयसिंगराव गायकवाड यांचा पदवीधरसाठी अर्ज दाखल, बोराळकरांसमोर आव्हान?
sakal

बोलून बातमी शोधा

2graduate_20constituency

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यानंतर भाजपचे पदाधिकारी तथा माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी (ता.दहा) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपचे जयसिंगराव गायकवाड यांचा पदवीधरसाठी अर्ज दाखल, बोराळकरांसमोर आव्हान?

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यानंतर भाजपचे पदाधिकारी तथा माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी (ता.दहा) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून जयसिंगराव गायकवाड, किशोर शितोळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र बोराळकर यांच्या नावाची घोषणा झाली. लोकसभा निवडणुकी वेळी ही माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.

मृत्युदराची पुन्हा उसळी, औरंगाबादेत दोन लाख ६४ हजार कोरोना चाचण्या निगेटिव्ह

मात्र ऐनवेळी युती झाली. त्यावेळीही श्री.गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पक्षातील वरिष्ठांनी त्यांची समजूत काढून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले होते. जयसिंगराव गायकवाड यांनी यापूर्वीही पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता. नऊ) अधिकृतरीत्या शिरीष बोराळकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यातच मंगळवारी (ता. दहा) जयसिंगराव गायकवाड यांनी अचानक उमेदवारी अर्ज दाखल केला. तथापि जयसिंगराव गायकवाड निवडणूक लढवतील की अर्ज परत घेतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहा जणांचे अर्ज
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी जयसिंगराव गायकवाड यांच्यासह सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची गुरूवार (ता. १२) शेवटची तारीख आहे. मंगळवारी (ता. दहा ) जयसिंगराव गायकवाड, अशिष देशमुख, प्रविणकुमार पोटभरे, भारत फुलारे, अॅड. यशवंत कसबे व शिरीष बोराळकर यांनी अर्ज भरले.

संपादन - गणेश पिटेकर