esakal | औरंगाबाद- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन जण ठार
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad accident news

अपघातग्रस्त दुचाकीचा पूर्णतः चुराडा झाला असून कारच्या समोरील भागाची नुकसान झाली

औरंगाबाद- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन जण ठार

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद): भरधाव वेगात बीडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारने दूचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने दोन जण ठार झाल्याची घटना धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा (ता.पैठण)फाट्या जवळ शुक्रवारी(ता.१९) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. रस्त्याच्या चौपदरीकरणानंतरही या महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच असून रस्त्यावरील वळणे सरळ करण्याला ठेकेदाराने 'खो' दिल्याने अपघाताला चाप बसण्याची चिन्हे आता धुसर बनली आहेत. 

यासंबंधी अधिक माहिती अशी, डोणगाव (ता.अंबड) येथील मुस्ताफा लालखा पठाण (वय ३३ वर्षे) व कडुबाळ निवृत्ती काशिद (वय ३२ वर्षे) हे दोघेजण बांधकाम मिस्त्रीचे काम करण्यासाठी दुचाकीवरून पाचोड येथे येत असताना बीडकडून भरधाव वेगात येणाऱ्या कारने (क्र.एम.एच.२३ बी.बी००७४) पाठीमागून दुचाकी(क्र.एम.एच२० ए.एन.२३८२)स जोराची धडक दिली. यात मुस्तफा पठाण जागीच ठार झाला, तर कडुबाळ काशिद याच्या डोक्याला मार लागल्याने त्यास गंभीर जखमी अवस्थेत उध्दव मगरे, सोमनाथ गितखने आदींनी दोघांना स्थानिक नागरिकाच्या मदतीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! गुणांसदर्भात दिलासादायक निर्णय

वैद्यकीय अधिकारी डॉ.साकेब सौदागर, डॉ. संदिपान काळे, डॉ.रामेश्वर घुगे यांनी प्रथमोपचारानंतर मुस्तफा पठाण यांस तपासून मृत घोषित केले. तर कडूबाळ काशिद यांस औरंगाबादला पाठविले असता रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त दुचाकीचा पूर्णतः चुराडा झाला असून कारच्या समोरील भागाची नुकसान झाली. या अपघाताची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार किशोर शिंदे,फेरोझ बर्डे हे करत आहे.