esakal | बीबी-का-मकबरा समोरील स्ट्रीट लाइट बंद; पर्यटकामध्येही नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

bb ka maqbara.

शहरात येणारे राज्याबाहेरील व जिल्ह्याबाहेरील पर्यटक हे दिवसभर दौलताबाद, वेरुळ, खुलताबादसह इतर पर्यटनस्थळी भेट देत असतात

बीबी-का-मकबरा समोरील स्ट्रीट लाइट बंद; पर्यटकामध्येही नाराजी

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: राज्यात अनलॉक झाल्यानंतर पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या उपाय-योजना करीत पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. यामुळे शहरातील दख्खनचा ताज म्हणून ओळखले जाणारे बीबी-का मकबरा रात्री दहापर्यंत पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.

अस असताना मकबऱ्यासमोरील मोकळ्या मैदानावरील हायमस्ट स्ट्रीट लाइट बंद असल्यामुळे पर्यटकांना अडचण येत आहेत. पुरातत्व विभागातर्फे महापालिकेस विनंती करूनही हा अद्यापही सुरू झालेला नाही. याविषयी पर्यटकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.

औरंगाबादच्या आणखी बातम्या वाचा

शहरात येणारे राज्याबाहेरील व जिल्ह्याबाहेरील पर्यटक हे दिवसभर दौलताबाद, वेरुळ, खुलताबादसह इतर पर्यटनस्थळी भेट देतात. मकबरा हा रात्री दहापर्यंत खुला राहतो. यामुळे पर्यटक शेवटी बीबी-का-मकबरा पाहण्यासाठी येतात. पण, मकबऱ्यात गेल्यावर तेथील स्ट्रीटलाइट बंद असल्यामुळे पर्यटकांना अडचण येत आहेत.

एकीकडे भारतीय पुरात्त्व विभाग पर्यटकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात. सर्वांनाचे सुरक्षित पर्यटन व्हावेत. याच उद्देशाने प्रयत्न करीत आहे. या बंद स्ट्रीटलाइट विषयी भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे महापालिकेकडे विनंती केली आहे. ही विनंती करून अर्धा महिना लोटला तरीही महापालिकेने कुठलीच उपाय-योजना केलेली नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

बीबी-का-मकबऱ्यास रोज दोन ते चार हजार पर्यटक भेट देतात. रविवारी (ता.१०) दोन हजारहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. हे लाइट बंद असल्यामुळे अनेक पर्यटक अंधार पडण्यापूर्वीच मकबऱ्यास भेट देऊन माघारी परततात आहेत. हा स्ट्रीट लाइट सुरू झाल्यास पर्यटकांची संख्याही वाढत चालली आहे.

सुरक्षिततेचा प्रश्‍न- 
पर्यटनस्थळावर बाहेर राज्यातील पर्यटक येत असल्यामुळे पर्यटनस्थळावर पर्यटकांना सुरक्षितता महत्त्वाची आहे. बीबी-का-मकबऱ्यासमोरील मोकळी जागा आणि पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रिटलाइट बंद असल्यामुळे येथे चोरी, अथवा काही गैर प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे हा स्ट्रिटलाइट चालू करण्याची गरज आहे.

(edited by- pramod sarawale)