मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदवले रुजू 

 औरंगाबाद : सीईओ एम. एम. गोंदवले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत शिरिष बनसोडे, प्रसाद मिरकले, अप्पासाहेब चाटे व अन्य अधिकारी.
औरंगाबाद : सीईओ एम. एम. गोंदवले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत शिरिष बनसोडे, प्रसाद मिरकले, अप्पासाहेब चाटे व अन्य अधिकारी.

औरंगाबाद -  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. गोंदवले मंगळवारी (ता.चार ) सायंकाळी रुजू झाले. मुंबईहून सायंकाळी त्यांचे शहरात आगमन झाले. त्यानंतर ते थेट जिल्हा परिषदेत दाखल झाले. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पवनीत कौर यांच्या जागेवर मुंबई येथे विक्रीकर उपायुक्‍त म्हणुन कार्यरत असलेले एम. एम. गोंदवले यांची नियुक्‍ती झाली. सोमवारी ते पदभार घेतील अशी चर्चा होती, मात्र ते मुंबईतील विक्रीकर उपायुक्‍त पदावरुन कार्यमुक्‍त झाल्याने ते मंगळवारी शहरात दाखल झाले. ते सायंकाळी इथे आल्यानंतर जिल्हा परिषदेत जाऊन त्यांनी पदभार घेतला.

त्यांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता पाटील, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, महिला व बाल विकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांच्यासह सर्व विभागप्रमुखांनी स्वागत केले. नंतर त्यांनी बैठक घेतली.

ज्या फायली तातडीने निकाली काढायच्या असतील त्या बुधवारी (ता.पाच) माझ्याकडे द्याव्यात अशा सूचना केल्या. तसेच बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर विभागनिहाय आढाव्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com