
औरंगाबाद : काहींनी काबाडकष्ट, धुणीभांडी, मोलमजुरी करून तर काहींनी नोकरी करून पै-पै गोळा करीत दागिने खरेदी केले. हेच दागिने सण-उत्सवांत परिधान करून वावरताना चोरांची नजर पडली अन् संधी साधून त्यांनी चालता-चालताच मेहनतीची कमाई क्षणार्धात हिसकावून नेली.
अशा घटनांची अनेकजणींना प्रचिती आली. त्यामुळे लाखमोलाचे सौभाग्याचे लेणे वाचविण्यासाठी केवळ पोलिसांच्याच भरवशावर राहून चालणार नाही, तर ते सजगतेने स्वत:ही सांभाळण्याची आता अधिक गरज निर्माण झाली आहे.
मागील काही वर्षांपासून औरंगाबादेत दागिने हिसकावण्यासाठी गॅंग सक्रिय होत्या. त्यात श्रीरामपूरची इराणी गॅंग पटाईत होती. तिचा बीमोड शहर पोलिसांनी केला.
त्यानंतर इतर जिल्ह्यांतील तरुण तसेच स्थानिक काही गुन्हेगारांनीही झटक्यात कमाई मिळवून देणाऱ्या मंगळसूत्र हिसकावण्याच्या "धंद्यात' शिरकाव केला. पोलिसांनी काही घटनांच्या मुळाशी जाऊन गुन्हेगारांवर कारवायाही केल्या; पण मंगळसूत्र चोरीचे प्रकार थांबत नसून काही नवखे, सराईतही या गुन्ह्यात सक्रिय असल्याचे दिसून आले आहे.
विशेषत: झटपट कमाईसाठी पोलिस दलातील एक जवानाकडूनही असे प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले होते. यात पोलिसांनीच कारवाईही केली. शहरात 2018 मध्ये काहीशा थांबलेल्या मंगळसूत्र चोरीच्या घटना 2019 मध्ये मात्र वाढल्या. 2020 वर्षात या घटना घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाकडून उपायांची गरज आहे.
अशी घ्या काळजी
सोबत मिरचीपूडही ठेवू शकता
आपण पायी जाताना अचानक कुणी जवळ आले आणि मंगळसूत्र अथवा इतर दागिने ओढत असेल तर स्वत:जवळची मिरचीची भुकटी तातडीने दागिने हिसकावणाऱ्या डोळ्यांत फेकता येऊ शकते. त्यामुळे संभाव्य घटनाही टळतील व स्वत:च्या संरक्षणाशिवाय मंगळसूत्र चोरालाही नागरिकांच्या मदतीने सहजरीत्या पकडता येऊ शकेल.
वर्ष 2019 मधील घटना
जानेवारी ते नोव्हेंबर 2019 पर्यंत मंगळसूत्र चोरीच्या 44 घटना.
डिसेंबर 2019 मध्ये दागिने हिसकावल्याच्या दोन घटना.
मंगळसूत्र चोरीच्या केवळ 14 घटना उघड. उकलीचे प्रमाण 30 टक्के.
वर्ष 2018 मधील घटना
मंगळसूत्र हिसकावल्याच्या 22 घटना.
दहा घटनांची झाली उकल, उकलीचे प्रमाण 45 टक्के.
हेही वाचा :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.