
बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळेही शिक्षक, विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ वाढला आहे.
औरंगाबाद: कोरोनामुळे तब्बल नऊ महिन्यांनंतर राज्यातील नववी ते दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. बोर्डाकडून दहावी, बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, परीक्षेबाबत बोर्डाकडून कुठलेच नियोजन नसल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संभ्रमात आहेत. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भातील सर्व निकष निश्चित करून ते तत्काळ जाहीर करून संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे.
लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ग्रामीण, शहरी भागातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तरीही अद्याप राज्यातील अनेक भागांतील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. अशातच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षा एक मे नंतर, तर बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळेही शिक्षक, विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ वाढला आहे.
मराठवाड्यासाठी कोरोना लसीचे एक लाख ३० हजार डोस दाखल, शनिवारी लसीकरणास होणार सुरुवात
अभ्यासासाठी कमी कालावधी-
एप्रिल, मेमध्ये परीक्षा झाल्यास शिक्षक व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अवघे साडेतीन महिनेच मिळणार आहेत. विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी फक्त साडेतीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. दुसरीकडे अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न, परीक्षा पद्धती, मूल्यमापन आदींबाबत निश्चित धोरण ठरलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाची दिशा काय ठेवावी, हेही स्पष्ट होत नसल्याचे चित्र आहे.
शिक्षकांपुढे प्रश्नांची रांग!
सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, परीक्षा कधी होणार, पेपर पॅटर्न कोणता, अभ्यासक्रम किती राहणार, लेखी व तोंडी परीक्षांच्या गुणांचे प्रमाण कसे असणार, अभ्यासक्रम कमी झाल्यामुळे मूल्यमापन, गुणदान किती व कसे राहणार, परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन होणार, परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावलीची की जुन्याच पद्धतीची असेल, त्या अनुषंगाने बोर्डाकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार का, गुणदान तक्त्याचे नियोजन काय आदी अनेक प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित केले जात आहेत.
पुण्याचे नामकरण संभाजीनगर करा...
"शासनाकडून दहावी, बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. त्यात विविध विषयांमधील धड्यातील एक किंवा दोन परिच्छेद कमी करण्यात आले आहेत. अशावेळी कोणता परिच्छेद कमी केला, हेच माहीत नसल्यामुळे अभ्यासाचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे बोर्डाने परीक्षेसंदर्भातील सर्व निकष निश्चिती करून स्पष्ट निर्देश तत्काळ द्यावेत. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचा संभ्रम दूर करावा."
वाल्मीक सुरासे, सचिव, संस्थाचालक महामंडळ.
(edited by- pramod sarawale)