का आलेत, पंधराशे उद्योग अडचणीत

अनिल जमधडे
शनिवार, 18 जानेवारी 2020

औरंगाबाद : शहरातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. येथील तब्बल पंधराशे उद्योग प्रदूषणाच्या रेड आणि ऑरेंज झोनमध्ये आले आहेत. त्यामुळेच या उद्योगांवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निर्बंध लादले आहेत. भविष्यात प्रदूषणाच्या पातळीवर काम केले नाही तर या उद्योगांना अतिरिक्त विस्तार करता येणार नाही, असे बजाविण्यात आले आहे. 

प्रदुषण पातळी चिंताजनक 

औरंगाबाद : शहरातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. येथील तब्बल पंधराशे उद्योग प्रदूषणाच्या रेड आणि ऑरेंज झोनमध्ये आले आहेत. त्यामुळेच या उद्योगांवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निर्बंध लादले आहेत. भविष्यात प्रदूषणाच्या पातळीवर काम केले नाही तर या उद्योगांना अतिरिक्त विस्तार करता येणार नाही, असे बजाविण्यात आले आहे. 

प्रदुषण पातळी चिंताजनक 

देशभर प्रदूषणाची पातळी वाढणे ही चिंताजनक बाब झाली आहे. या वाढत्या प्रदूषणाच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वर्ष 2017-18 मध्ये देशभरातील अव्वल प्रदूषित क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबादसह महाराष्ट्रातील नऊ शहरांचा सामावेश आहे. याच सर्वेक्षणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय हरित लवादाने या सर्व प्रदूषणाची पातळी ओलांडलेल्या क्षेत्रांवर अनेक निर्बंध आणले; तसेच त्या भागातील प्रदूषणाच्या विळख्यात असलेल्या उद्योगांच्या विस्तारांना स्थगिती दिली. 

हेही वाचा : का वाढलाय ऑनलाईन वीजबिल भरणा 

चार गटात वर्गवारी 

प्रदूषणाची रेड, ऑरेंज, ग्रीन आणि व्हाइट अशा चार गटांत वर्गवारी केली जाते. यामध्ये रेड आणि ऑरेंज या दोन्ही झोनची प्रदूषण पातळी ही चिंताजनक समजली जाते. औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 4 हजार 700 उद्योग आहेत. त्यापैकी 1,496 उद्योग रेड आणि ऑरेंज झोनमध्य आले आहेत. त्यामध्ये केमिकल, स्टील यासह अन्य उद्योगांचा सामावेश आहे. त्यामुळेच औद्योगिक विकास महामंडळाने नुकतेच परिपत्रक जारी करून जिल्ह्यातील 1496 उद्योगांना प्रदूषणाची पातळी घटविल्याशिवाय विस्ताराला परवानगी मिळणार नसल्याचे बजाविले आहे. याशिवाय महापालिका व अन्य यंत्रणांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा : आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला! 

ही आहेत ती शहरे 

औरंगाबादसह तारापूर, चंद्रपूर, डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई, चेंबूर, पिंपरी-चिंचवड, महाड या शहरांच्या उद्योगांची प्रदूषण पातळी वाढल्याचा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सर्वेक्षण अहवाल आहे. 

 

प्रदूषणाची पातळी ओलांडलेल्या उद्योगांच्या अनुषंगाने परिपत्रक जारी करण्यात आले आहे. संबंधित उद्योगांना सूचना दिल्या आहेत. भविष्यात या सर्व उद्योगांच्या विस्तारावर बंधने आली आहेत. प्रदूषणाच्या योग्य उपाययोजना केल्यास या उद्योगांना विस्ताराची परवानगी दिली जाऊ शकते. 
भूषण हार्शे, कार्यकारी अभियंता एमआयडीसी 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurnagabad About pollution News