esakal | का वाढलाय ऑनलाईन वीजबिल भरणा 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल ऍपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे. डिसेंबर महिन्यात औरंगाबाद परिमंडलात दोन लाख 11 हजार ग्राहकांनी 44 कोटी 80 लाख रुपयांच्या वीजबिलांचे ऑनलाइन पेमेंट केले आहे.

का वाढलाय ऑनलाईन वीजबिल भरणा 

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलातील दोन लाखांहून अधिक ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलांपोटी 44 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा ऑनलाइन भरणा केला आहे. 

महावितरणने www.mahadiscom.in या वेबसाईटवर ऑनलाईन बिल पेमेंट सुविधेसह महावितरण मोबाईल ऍप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहणे आणि भरण्यासाठी नेटबॅंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डसचा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

रांगेची कटकट संपली 

रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल ऍपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे. डिसेंबर महिन्यात औरंगाबाद परिमंडलात दोन लाख 11 हजार ग्राहकांनी 44 कोटी 80 लाख रुपयांच्या वीजबिलांचे ऑनलाइन पेमेंट केले आहे. यात औरंगाबाद शहर मंडलातील 97 हजार 927 ग्राहकांनी 22 कोटी 73 लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडलातील 80 हजार 610 ग्राहकांनी 14 कोटी 96 लाख तर जालना मंडलातील हजार 33 हजार 195 ग्राहकांनी सात कोटी 11 लाख रुपयांचा ऑनलाइन वीजबिल भरणा केला आहे. या माध्यमातून ग्राहकांना वीजबिल ऑनलाइन भरण्याचे महत्त्व पटत असल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा : उदयनराजेंद्र राऊतांच्या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे 

गो-ग्रीनने होते बचत 

महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाइन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी "गो-ग्रीन' संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा 10 रुपये सूट दिली जात आहे. छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

बिलात 0.25 टक्के सूट 

क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे. तसेच ऑनलाइन पेमेंट केल्यास वीजबिलात 500 रुपयांच्या मर्यादेत 025. टक्के सवलत मिळते. 

क्‍लिक करा : वाहनांच्या फास्टॅगला लागलाय ब्रेक 

का वाढलाय ऑनलाईन वीजबिल भरणा 

वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटवर "पेमेंट हिस्ट्री' तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाइन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. 


 

go to top