esakal | BAMU Admission: पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास रिक्त जागांवर आठ मार्चपर्यंतच प्रवेश

बोलून बातमी शोधा

BAMU News Aurangabad}

प्रवेश प्रक्रिया, ऑफलाईन वर्ग, परीक्षा, प्रात्यक्षिक घेताना केंद्र आणि राज्य सरकारचे नियम पाळावे लागणार आहेत.

BAMU Admission: पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास रिक्त जागांवर आठ मार्चपर्यंतच प्रवेश
sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ८ मार्चपर्यंत प्रवेशाची संधी आहे. सर्व प्रवेश फेरीनंतर रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहेत. असे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता राबविण्यात आलेल्या ऑनलाईन प्रथम, द्वितीय, समुपदेशन, तत्काळ प्रवेश फेरीनंतरही प्रवेशासाठी रिक्त जागावर आठ मार्चपर्यंत प्रवेश देण्यास कुलगुरुंनी मान्यता दिली आहे.

वाचा - राजीनाम्यावरुन मुंडे बहीण-भाऊ पुन्हा समोरासमोर, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर राजकारण!

प्रवेश प्रक्रिया, ऑफलाईन वर्ग, परीक्षा, प्रात्यक्षिक घेताना केंद्र आणि राज्य सरकारचे नियम पाळावे लागणार आहेत. रिक्त जागा केवळ गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रवेश मिळणार आहे. त्यानंतरही जागा रिक्त राहत असतील तर, ऑनलाईन अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्याकडून राखीव प्रवर्ग, दिव्यांग, माजी सैनिक पाल्य यांचेकडून १०० रुपये तर, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून २०० रुपये नोंदणी शुल्क असणार आहे. त्यांचे अर्ज स्विकारून छाननी करून पात्रतेनुसार गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्यात येणार आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर