पाच लाख ग्राहकांना सांगणार बँक खासगीकरणांचे धोके

प्रकाश बनकर
Sunday, 19 July 2020

देविदास तुळजापुरकर म्हणाले, की या संघटनेचे कार्यकर्ते पाच लाख बँक ग्राहकापर्यंत विविध समाज माध्यमाचा वापर करत संपर्क प्रस्थापित करून त्यांना बँक खासगीकरणाचे धोके त्यांना समजावून सांगणार आहेत. कोरोना महामारी आपत्तीचा फायदा घेत सरकार बँक खासगी करणाच डाव साधत आहे.

औरंगाबाद : केंद्र सरकारतर्फे बँकांच्या खासगीकरणाचे धोरण राबविले जात आहे. या विरोधात बँक संघटनातर्फे वेळोवेळी आवाज उठवण्यात आला आहे. बँकेच्या खासगीकरणाचे काय धोके आहेत, हे प्रत्येक बँक कर्मचाऱ्यापर्यत पोहचविण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशन या संघटनेतर्फे ही राज्यव्यापी मोहिम हाती घेण्यात आली आहे. बँक राष्ट्रीयीकरणाच्या ५१ व्या वर्धापनदिनापासून रविवार (ता.१९) यास प्रारंभ करण्यात आला असल्याची माहीती फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी दिली. 

हेही वाचा- बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या  

देविदास तुळजापुरकर म्हणाले, की या संघटनेचे कार्यकर्ते पाच लाख बँक ग्राहकापर्यंत विविध समाज माध्यमाचा वापर करत संपर्क प्रस्थापित करून त्यांना बँक खासगीकरणाचे धोके त्यांना समजावून सांगणार आहेत. कोरोना महामारी आपत्तीचा फायदा घेत सरकार बँक खासगी करणाच डाव साधत आहे. थकीत कर्जामुळे बॅंका धोक्यात आहेत. खासगी मोठ्या उद्योगांना हजारो कोटी रुपयांनी लुटले आहे. तेच आज खासगीकरणाच्या प्रक्रियेत या बँकांचे मालक होऊ पाहत आहेत.

महत्त्वाची बातमीः आता कोरोना रुग्णांवर घरीच होणार उपचार

ग्लोबल ट्रस्ट बँकेला कोणी बुडवले? कराड बँक कोणामुळे दिवाळखोरीत निघाली होती? अखेर सरकारने त्यांना सार्वजनिक क्षेत्रात घेऊन वाचवले. येस बँकेला सार्वजनिक क्षेत्रातल्या स्टेट बँकेने वाचवले अन्यथा जेपीएमसी बँकेच्या ठेवी दरांचे झाले, तेच या बँकेच्या ठेवीदारांचे झाले असते. आज ६० वर्षानंतर देखील रुपी बँकेचे ठेवीदार रस्त्यावरच आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे व्यापक जनअभियान हाती घेण्यात आले आहे, अशी माहीतीही श्री. तुळजापुरकर यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank Privatision Effcet Auranagabad Marathi News