काय भयानक अनुभव आला या शिक्षिकेला वाचा... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

शिक्षीकेची शाळेत बदनामी करायला सुरूवात केली. या प्रकाराला त्रासून शिक्षीकेने पतीसोबत तेथील नोकरी सोडली. त्यानंतर ते औरंगाबादेत राहण्यासाठी आले. त्यानंतर मात्र सुरजने शिक्षीकेच्या सासरच्या लोकांकडे बदनामी करणे सुरू केले. तसेच शिक्षीकेचा पाठलाग सुरुच ठेवला. पाठलाग सोडण्यासाठी त्याने चाळीस हजाराच्या खंडणीची मागणी केली.

औरंगाबाद - इंग्रजी शाळेच्या शिक्षकांच्या एका वॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकेसोबत तरुणाची ओळख झाली. या तरुणाने शिक्षीकेची पर्सनल चॅटींगचा प्रयत्न केला. पण शिक्षिकेने त्याला थारा दिला नाही. त्यानला समजही दिली. पण राग आल्याने त्याने शिक्षिकेचा पाठलाग सुरु केला. शाळेतील उपक्रमातील शिक्षिकेचे फोटो एडीट करुन त्यांची नातेवाईकांत बदनामी केली.

22 एप्रील 2019 ते 23 डिसेंबर या कालावधीत बिड आणि औरंगाबादला हा प्रकार घडला. या प्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीनुसार तरुणाविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात 23 डिसेंबरला विनयभंग व खंडणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बावीस वर्षीय पिडीत विवाहित शिक्षिकेने याबाबत तक्रार दिली. त्यानुसार आठ महिन्यापुर्वी त्या बीड जिल्ह्यातील एका इंग्रजी शाळेत अध्यापनाचे काम करीत होत्या. या शाळेतील शिक्षीकांचा एक व्हॉटसअप ग्रुप होता. या ग्रुपमध्ये शिक्षीका तसेच संशयित सुरज संभाजीराव शिनगारे नावाचा तरुणही होता.

 

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...
 

ग्रुपवरील चर्चेच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. सुरज त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी शाळेत येत होता. दीड 
वर्षापुर्वी सुरजने या शिक्षीकेच्या वैयक्तिक क्रमांकावर मॅसेज व कॉल करायला सुरूवात केली. या शिक्षीकेने त्याला समजावून सांगितले नंतर समजही दिली. पण याचा उपयोग झाला नाही. सुरजला या राग आल्याने त्याने शिक्षीकेची शाळेत बदनामी करायला सुरूवात केली.

या प्रकाराला त्रासून शिक्षीकेने पतीसोबत तेथील नोकरी सोडली. त्यानंतर ते औरंगाबादेत राहण्यासाठी आले. त्यानंतर मात्र सुरजने शिक्षीकेच्या सासरच्या लोकांकडे बदनामी करणे सुरू केले. तसेच शिक्षीकेचा पाठलाग सुरुच ठेवला. पाठलाग सोडण्यासाठी त्याने चाळीस हजाराच्या खंडणीची मागणी केली.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

असे शिक्षिकेने तक्रारीत नमुद केले. त्यानुसार संशयित सुरजविरुद्ध विनयभंग, खंडणीच्या गुन्ह्याची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली. तपास उपनिरीक्षक मुळे तपास करीत आहे. 

मोबाईल क्रमांकच नाही तर गावही बदलले पण... 
संशयित सुरजने या शिक्षीकेची मोठ्या प्रमाणात शाळेत व सासरच्या लोकांकडे बदनामी करणे सुरू केले. शिक्षीकेने व तिच्या पतीने त्यांच्या नोकऱ्या सोडून औरंगाबाद गाठले. मोबाइल क्रमांकही बदलला. पण तरीही सुरजने सासरच्या मंडळीनी कॉल करून शिक्षीकेचा मोबाइल क्रमांक विचारणे सुरु केले होते. त्यांनी नंबर न दिल्याने त्याच्याकडून धमक्‍याही देण्यात आल्या होत्या. 

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be Aware While Someone Comes on Personal Chat Aurangabad News