भाजप कार्यकर्त्याच्या हत्येची पाकिस्तानी झेंडा जाळून युवा मोर्चाने केला निषेध

मधुकर कांबळे
Saturday, 31 October 2020

जम्मू - काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

औरंगाबाद : जम्मू - काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. जम्मू - काश्मीरमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांकडून भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शनिवारी (ता.३१) हडको टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजीराजे चौकात निदर्शने करण्यात आली.

Job Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात

यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, भाजप जिंदाबाद, भाजयुमोचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध नोंदवण्यात आला. भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष राजगौरव वानखेडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यात प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनोज भारस्कर, हर्षवर्धन कराड, अभिषेक जैस्वाल, राहुल रोजतकर, दीपक खोतकर, पंकज साखला, राहुल नरोटे, सौरभ शिंदे, सतीश ताठे, स्वामी दुबे, समीर लोखंडे, सागर पाले, बाबासाहेब गवळी, संग्राम पवार, मुकेश चित्रक, अमोल झळके, सुनील वाणी, अमोल तांबे, शैलेश हेकाडे, रोहित साबळे, प्रथमेश दुधगावकर आदी सहभागी झाले होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhartiya Janta Yuva Morcha Burn Pakistani Flag Aurangabad