esakal | भाजपचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याविरोधात औरंगाबादेत निदर्शने, अत्याचार प्रकरणी कारवाईची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Agitation Against NCP Office Bearer In Aurangabad

औरंगाबाद येथील क्रांती चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख (रा.शिरुर कासार, जि.बीड) यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी (ता.३०) निदर्शने करण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याविरोधात औरंगाबादेत निदर्शने, अत्याचार प्रकरणी कारवाईची मागणी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद : औरंगाबाद येथील क्रांती चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख (रा.शिरुर कासार, जि.बीड) यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी (ता.३०) निदर्शने करण्यात आली आहे. शहरातील एका तरुणीने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप शेख यांच्यावर केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सदरील आरोप मेहबूब शेख यांनी फेटाळले आहेत.

ते घटनेच्या दिवशी मुंबईत होते असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. निदर्शनाप्रसंगी पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटपटची घटना घडली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून पुतळा जाळण्यात आला. तसेच घोषणा देण्यात आल्या. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. या वेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अतुल सावे, राजू वानखेडे, लता जलाल यांच्यासह कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या.  

संपादन - गणेश पिटेकर