esakal | भाजपची राज्यसभेची उमेदवारी औरंगाबादच्या नेत्याच्या गळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

या तिसऱ्या नावामुळे भारतीय जनता पक्ष नव्या चेहऱ्याच्या शोधात असून, जुन्या नेत्यांना पूर्णविराम देण्याचेच संकेत दिले आहेत काय, अशी चर्चा रंगू लागली आहे. या नव्या नेत्याच्या नावासाठी भाजपमधल्या कोणत्या गटाने आपले वजन वापरले, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपची राज्यसभेची उमेदवारी औरंगाबादच्या नेत्याच्या गळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्यसभेच्या एकूण 55 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होत आहे. या राज्यसभेच्या रिक्त जागांपैकी महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची दोन नावं यापूर्वी जाहीर केली होतीपण. तिसऱ्या जागेसाठी भाजपचे बाजूला पडलेले नेते एकनाथ खडसे किंवा खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता ही उमेदवारीची माळ एका नव्याच नावाच्य गळ्यात पडली आहे.

या तिसऱ्या नावामुळे भारतीय जनता पक्ष नव्या चेहऱ्याच्या शोधात असून, जुन्या नेत्यांना पूर्णविराम देण्याचेच संकेत दिले आहेत काय, अशी चर्चा रंगू लागली आहे. या नव्या नेत्याच्या नावासाठी भाजपमधल्या कोणत्या गटाने आपले वजन वापरले, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्या नावाला भाजपच्या संसदीय मंडळानं मान्यता दिली असून विधान परिषदेची उमेदवारी अमरीश पटेल यांना जाहीर झाली आहे. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

भाजपचे राज्यातले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राज्यसभेची उमेदवारी तरी किमान मिळेल, अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. पण आता या नव्या नेत्याचं नाव भाजपच्या यादीत आल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. हे नवे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड. 

औरंगाबाद शहरातले नामांकित बालरोगतज्ज्ञ असलेले डॉ. कराड हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष झाले. अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले डॉ. कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जात. आताही ते पंकजा मुंडे यांचे निकटस्थ मानले जातात. आता त्यांच्या उमेदवारीमुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

go to top