esakal | मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून शिरीष बोराळकरांची उमेदवारी जाहीर, आता इच्छुकांमध्ये नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

Shirish Boralkar

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपतर्फे अखेर सोमवारी (ता.नऊ) शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मतदारसंघासाठी अनेकजण इच्छुक असताना यात बोराळकर यांनी बाजी मारली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून शिरीष बोराळकरांची उमेदवारी जाहीर, आता इच्छुकांमध्ये नाराजी

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपतर्फे अखेर सोमवारी (ता.नऊ) शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मतदारसंघासाठी अनेकजण इच्छुक असताना यात बोराळकर यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या राष्ट्रीय महसचिव अरूण सिंह यांनी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील उमेदवारीच्या नावाची यादी जाहीर केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असेलेल्या बोराळकरांचे नाव आहे. यामुळे इतर इच्छुकांमध्ये नाराजी दिसून आली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने कसली कंबर, माजी मंत्री निलंगेकर निवडणूक प्रमुख


भाजपतर्फे दुसऱ्यांदा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बोराळकरांनी संधी देण्यात आली आहे. याच निवडणुकीत प्रविण घुगे, किशोर शितोळे, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनीही उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग लावली होती. रविवारपासून (ता.आठ) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शहरात मुक्कामी होते. त्यामुळे मराठवाड्यातील उमेदवाराच्या नावाची घोषणा ते करतील असे वाटले होते.

मात्र उमेदवाराच्या नावाची यादी राष्ट्रीयस्तरावरून जाहीर करण्यात आली. मराठवाड्यातील उमेदवारी मिळविण्यासाठी जातीय समीकरण करीत ते मिळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो फोल ठरला. पुन्हा एकदा २०१४ प्रमाणे उमेदवारी मिळविण्यात शिरीष बोराळकर यांना यश आले आहे. बोराळकर यांचे नाव निश्‍चित असल्याने दोन दिवसांपासून बहुजनावर अन्याय होत असल्याच्या पोस्टही मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेवे-दावे विसरा, पदवीधरचे काम करा; चंद्रकांत पाटील यांची भाजप कार्यकर्त्यांना सूचना

आता नाराजांकडे लक्ष
पदवीधर मतदारसंघासाठी प्रमुख दावेदार मानले जाणारे प्रविण घुगे, किशोर शितोळे यासह माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांना संधी मिळाली नाही. तिघांनीही मोठी तयारी या निवडणुकीसाठी केली होती. मात्र शिरीष बोराळकर यांना संधी मिळाल्याने इच्छुक नाराज झाले आहेत. पहिलेच पक्षात उमेदवारीवरून गटतट निर्माण झाले असताना आता बहुजनातील उमेदवारांनी डावल्यामुळे नाराज असलेले काय भुमिका घेणार याकडेच लक्ष लागुन आहेत.


 

संपादन - गणेश पिटेकर