esakal | मराठवाडा पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने कसली कंबर, माजी मंत्री निलंगेकर निवडणूक प्रमुख
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

कधीकाळी वर्चस्व असलेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपला यश मिळवून देण्याची किमया करणारे माजी मंत्री निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने कसली कंबर, माजी मंत्री निलंगेकर निवडणूक प्रमुख

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद  : कधीकाळी वर्चस्व असलेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपला यश मिळवून देण्याची किमया करणारे माजी मंत्री निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच त्यांच्या नावाची घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांनी मोठ्या मताधिक्याने आपण ही जागा निवडून आणाल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

हेवे-दावे विसरा, पदवीधरचे काम करा; चंद्रकांत पाटील यांची भाजप कार्यकर्त्यांना सूचना

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून जयसिंगराव गायकवाड यांनी दोन वेळी तर श्रीकांत जोशी यांनी एकदा या मतदारसंघातून विजय मिळवला होता. परंतु २००८ आणि २०१४ या सलग दोन निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने या मतदारसंघावर पकड मिळवली. २०१४ च्या निवडणुकीत शिरिष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने पक्षावर असलेले दुःखाचे सावट याचा परिणाम निवडणूक निकालावर झाल्याचे सांगितले जाते. आता भाजपने हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी पुन्हा शिरीष बोराळकर यांना संधी दिली. त्यांचे नाव अंतीम झाल्याची चर्चा आहे.

तथापी शेवटच्या क्षणापर्यंत प्रवीण घुगे, किशोर शितोळे, जयसिंगराव गायकवाड हेदेखील स्पर्धेत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.आठ) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठवाडा पदवीधर निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपची राज्यात सत्ता असतांना निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यात पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले होते. जिल्हा परिषद, महापालिका, लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाला चांगले यश मिळाले.

औरंगाबादेत दिवसभरात ६५ जणांना कोरोनाची लागण, जिल्ह्यात ६९५ रुग्णांवर उपचार सुरू

निलंगेकर यांनी लातूर महापालिकेत झिरो असलेल्या भाजपला हिरो बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूरात हा चमत्कार घडल्यामुळे पक्ष नेतृत्वाने निलंगेकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत जबाबदार सोपवली आहे. महापालिका निवडणूक पाहता निलंगेकर यांच्यावर याआधीच पक्षाने प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर आता मराठवाडा पदवीधरसाठी देखील त्यांनाच प्रमुख करण्यात आल्याने त्यांचे पक्षातील वजन वाढले असल्याचे दिसून आले आहे.