esakal | भाजपला लव्ह माहितीच नाही, इम्तियाज जलील यांचा लव्ह जिहाद कायद्यावरुन टोला
sakal

बोलून बातमी शोधा

558jaleel_d

लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिमांना लक्ष्य करू पाहणाऱ्या भाजपने या कायद्याची अंमलबजावणी म्हणून आपल्या पक्षातील शाहनवाज हुसैन, मुख्तार अब्बास नक्वी यांना आधी जेलमध्ये टाकावे आणि मग कायदा लागू करावा, असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवार (ता.२५) पत्रकार परिषदेत लगावला.

भाजपला लव्ह माहितीच नाही, इम्तियाज जलील यांचा लव्ह जिहाद कायद्यावरुन टोला

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : आधी मांसबंदी, नंतर तिहेरी तलाक आता लव्ह जिहाद विरोधी कायदा आणून भाजप मुस्लिम समाजात भिती घालण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे आम्हाला जगणे मुश्कील होईल असा त्यांचा समज होता. पण या देशातील मुसलमान अशा कायद्यांना घाबरणार नाही, आमचे या देशावर प्रेम आहे आणि ते कायम राहील. भाजपला लव्ह माहितीच नाही. त्यांनी कधीच संविधानावर प्रेम दाखविले नाही. लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिमांना लक्ष्य करू पाहणाऱ्या भाजपने या कायद्याची अंमलबजावणी म्हणून आपल्या पक्षातील शाहनवाज हुसैन, मुख्तार अब्बास नक्वी यांना आधी जेलमध्ये टाकावे आणि मग कायदा लागू करावा, असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवार (ता.२५) पत्रकार परिषदेत लगावला.


मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून एमआयएमने कुणाल खरात यांना उमेदवारी दिली आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. इम्तियाज जलील म्हणाले, पदवीधर मतदारसंघात आम्ही उमेदवार दिल्यावर पुन्हा आमच्यावर मतांचे धुव्रीकरण करण्यासाठी लढत आहात का? असा आरोप केला जात आहे. पण आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्हाला निवडणूक लढवण्यासाठी सोनिया गांधी, शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांना विचारण्याची गरज नाही. आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या मोठ्या पक्षांचे बिहार विधानसभा निवडणुकीत काय हाल झाले हे आपण पाहिले.

दुसरीकडे एमआयएमने मिळवलेले यश देखील सगळ्यांच्या समोर आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या एखाद्या घटनेवरून देशभरातील मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारकडून होतो आहे. देशात कोरोना सारखे जागतिक संकट आहे, बेरोजगारीचा प्रश्न भंयकर बनला आहे. देशाची आर्थिक स्थिती मरणासन्न अवस्थेत आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी एका विशिष्ट समाजाला त्रास देण्याचा हेतून लव्ह जिहादसारखे कायदे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. लव्ह जिहादच्या कायद्याची अंमलबजावणी भाजपला आधी आपल्याच पक्षापासून करावी लागेल. शाहनवाज हुसैन, मुख्तार अब्बास नक्वी या भाजपमध्ये मोठ्या पदावर असलेल्या नेत्यांना आधी या कायद्या अंतर्गत जेलमध्ये टाका, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर