esakal | विकासनिधी येत नाही, आपण आणलेल्या निधीचे श्रेय घेतले जात आहे; पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

4Dhahnjay_Pankaja_0

आपण सर्वांना गुलाल लावला. आता शिरीष बोराळकरांची बारी आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे दिवंगत मुंडे यांच्यावर प्रेम आणि पंकजा मुंडेवर विश्वास आहे, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

विकासनिधी येत नाही, आपण आणलेल्या निधीचे श्रेय घेतले जात आहे; पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना जाऊन सहा वर्ष झाले. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. दु:ख, पीडा व वेदना कमी झाल्या नाही. परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची उर्मी कार्यकर्त्यांची कायम आहे. आपण सर्वांना गुलाल लावला. आता शिरीष बोराळकरांची बारी आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे दिवंगत मुंडे यांच्यावर प्रेम आणि पंकजा मुंडेवर विश्वास आहे, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. ओठात एक आणि पोटात एक असे काम आपण करत नाही. किंतू व परंतु न बाळगता कामाला बोराळकरांच्या लागा आणि दिवंगत मुंडेंचे अधुरे स्वप्न पूर्ण करा असे आवाहनही त्यांनी केले.


मराठवाडा पदवीधर मतदार संघातील भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात मंगळवारी (ता.२४) श्रीमती मुंडे बोलत होत्या.उमेदवार श्री. बोराळकर, प्रवीण घुगे, आमदार सुरेश धस, लक्ष्मण पवार, भिमराव धोंडे, आदिनाथ नवले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेशराव आडसकर, अक्षय मुंदडा आदी उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या, आपण घेतलेले निर्णय सरकार थांबवत आहे. जिल्ह्यासाठी विकासनिधी आता येत नाही. आपण आणलेल्या निधीचे श्रेय घेतले जात आहे, असा निशाणा साधत नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही. अतिवृष्टीची कोणतीही भरपाई मिळाली नाही. राज्यातील जनता पूर्ण नाराज आहे. सत्ता परिवर्तनाची वेळ येऊन ठेपली. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय सत्ता परिवर्तनाचा संकेत ठरेल. लक्ष्मण पवार, सुरेश धस, भीमराव धोंडे, अक्षय मुंदडा, रमेशराव आडसकर, प्रवीण घुगे यांचीही भाषणे झाली. यावेळी सविता गोल्हार, अशोक लोढा, भारत काळे, राजाभाऊ मुंडे, विजयकुमार पालसिंघनकर, नवनाथ शिराळे, सर्जेराव तांदळे, निळकंठ चाटे आदी उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर

loading image