esakal | भाजपकडून औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराची मागणी; जलील म्हणाले, सुंदर शहर उद्धवस्त करु नका! 
sakal

बोलून बातमी शोधा

Imtiaz Jaleel

सध्या राज्यात औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचे राजकारण पेटले आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळी मागणी करताना दिसत आहेत.

भाजपकडून औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराची मागणी; जलील म्हणाले, सुंदर शहर उद्धवस्त करु नका! 

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : सध्या राज्यात औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचे राजकारण पेटले आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळी मागणी करताना दिसत आहेत. आता विमानतळाच्या नामांतराची मागणी भाजपने केली आहे.  पक्षाचे खासदार भागवत कराड यांनी मंगळवारी (ता.पाच) दिल्लीत नागरी उड्डायन तथा शहरनियोजन मंत्री हरिदीप सिंग पुरी यांची भेट घेतली आहे. याबाबत स्वतः पुरी यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. याला औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी विरोध केला असून माझे सुंदर शहर उद्धवस्त करु नका अशी त्यांनी मागणी केली आहे.

पती हर्षवर्धनविरोधात संजना जाधव निवडणुकीच्या रणांगणात, मुलाचे आईविरुद्ध पॅनल

अनेक विषयांवर मंत्र्यांशी चर्चा
औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असा नामांतराचा मुद्दा चर्चा करण्यात आला. याकडे आम्ही लक्ष देऊ असे आश्वासन मंत्र्यांनी खासदार कराड यांना दिला. तसेच औरंगाबाद विमानतळावरील पायाभूत विकास, विमानसेवा, शहरातील नगर योजना विशेषतः स्मार्ट शहर प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली, अशी माहिती नागरी उड्डायन मंत्री हरिदीप सिंग यांनी ट्विटने दिली आहे. 

औरंगाबाद रेल्वेस्थानकाला पोलिस संरक्षण, नामांतरासाठी मनसेकडून आंदोलनाची शक्यता

खासदार इम्तियाज जलील यांची मागणी
भाजपच्या नवीन खासदारांकडून औरंगाबादच्या लोकांच्या चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे. शहराला सक्षम वाहतूक जोडणी, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, विमानतळाचे विस्तारीकरणाची गरज आहे.

हे मुद्दे उपस्थित करणे चांगली बाब नाही की त्याऐवजी बिनमहत्त्वाचे विषय पुढे करणे? या प्रकारच्या घाणरेड्या राजकारणामुळे माझे सुंदर शहर उद्धवस्त होईल, असे  खासदार इम्तियाज जलील प्रश्न विचारतात. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. 

go to top