
भाजप हा एकमेव पक्ष आहे, जो राष्ट्रवादाच्या भावनेने कार्य करतो. कामगार हे सामान्य लोकांशी संवाद आणि संबंधांचे माध्यम आहे. म्हणून सर्व कामगारांनी संयम व शिस्तीने संस्थेसाठी काम केले पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : भाजप हा एकमेव पक्ष आहे, जो राष्ट्रवादाच्या भावनेने कार्य करतो. कामगार हे सामान्य लोकांशी संवाद आणि संबंधांचे माध्यम आहे. म्हणून सर्व कामगारांनी संयम व शिस्तीने संस्थेसाठी काम केले पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. सिल्लोड येथील भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
राज्यमंत्री दानवे म्हणाले, की कोरोनाच्या प्रादूर्भावनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. इतर निवडणुकांप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. या प्रसंगी वेळी भाजप प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी, भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, माजी महापौर बापू घडामोडे, किशोर धनायत यांनी दोन दिवसांच्या शिबिरात मार्गदर्शन केले.
यावेळी माजी आमदार सांडु पाटील लोखंडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, माजी सभापती अशोक गरुड, सुनिल मिरकर, श्रीरंग साळवे, गजानन राऊत, गणेश बनकर, अशोक तायडे, भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया, दादाराव आळणे, अनिल खरात, विलास पाटील, सुधाकर सोनवणे, किशोर गवळे, कैलास जंजाळ, संजय डमाळे, गंगा ताठे, दत्ता बडक, नारायण बडक, नारायण खोमणे, किरण पवार, मनोज मोरेल्लू, विजय वानखेडे, अमोल शेजुळ, अनिल बनकर, सोमिनाथ कळम यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
संपादन - गणेश पिटेकर