औरंगाबाद शहरात रिमझिम पाऊस, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण

ई सकाळ टीम
Sunday, 13 December 2020

औरंगाबाद शहरात रविवारी (ता.१३) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात रविवारी (ता.१३) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. तसेच थंडीचा जोर वाढला आहे. अनेकांनी ऊबदार कपडे घालून बाहेर पडल्याचे दिसले. शनिवारी (ता.१२) ही ढगाळ वातावरण होते. भारतीय हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे.

गंगापूर तालुक्यात पाऊस
गंगापूर तालुक्यातील येसगाव, दिघी व परिसरात रविवारी (ता.१३) दुपारी चारच्या सुमारास अचानक बेमोसमी पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरण व गारवा निर्माण झाला होता. अचानक पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. कापूस वेचणी सुरु असल्याने नागरिक कापूस वेचणी करीत होते. मात्र पावसाची रिपरिप सुरु झाल्याने शेतकऱ्यांना घरचा रस्ता धरावा लागला. या बेमोसमी पावसाने गव्हाचे पीक सध्या चांगल्या स्थितीत असले तर त्यावर कोकडा, मावा पडून पिकाचे उत्पादन घटेल व हरभरा पिकाची नुकतीच पेरणी केली असली तरी या पावसाने त्या पिकाचेही अतोनात नुकसान होणार असल्याचे शेतकरी सतीश खोचे यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Untimely Rain In Aurangabad